Wednesday, May 22, 2024
Homeराज्यदाभोलकरांच्या खूनाच्या सूत्रधारांना ताबडतोब अटक करा – डॉ.बी.एम.हिर्डेकर

दाभोलकरांच्या खूनाच्या सूत्रधारांना ताबडतोब अटक करा – डॉ.बी.एम.हिर्डेकर

कोल्हापूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला २० ऑगस्ट रोजी दहा वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या खूनाच्या आरोपात सचिन अंदुरे आणि शरद कळस्कर या दोन तरुणांना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र या मारेकऱ्यांच्या मागचे खरे सूत्रधार कोण हे तपास यंत्रणा आणि सरकार यांनी अजूनही स्पष्ट केलेले नाही. डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने “सॉक्रेटिस ते दाभोलकर, पानसरे व्हाया तुकाराम” हे रिंगण नाटक सादर करून डॉक्टर दाभोळकरांना सांस्कृतिक अभिव्यक्तीच्या माध्यमातून आदरांजली व्यक्त केली. (Arrest the masterminds of Dabholkar’s murder immediately – Dr. BM Hirdekar)

तसेच २० ऑगस्ट रोजी दाभोलकरांच्या स्मृतिदिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पुतळा – सीपीआर चौक – राजर्षी शाहू महाराज पुतळा – बिंदू चौक या मार्गावरून “निर्भय मॉर्निंग वॉक” काढण्यात आला. यावेळी डॉ दाभोलकरांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करत विधायक, कृतिशील आणि कालसुसंगत धर्मचिकितेचा वसा आणि वारसा कायम जपण्याचा संकल्प महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते यांनी व्यक्त केला. 

यावेळी बोलताना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष डॉ.बी.एम. हिर्डेकर म्हणाले, “आपल्या देशात एका बाजूला विचारवंतांचे खून होत आहेत आणि दुसरीकडे त्यांचे खरे मारेकरी तसेच स्त्रियांवर आणि विविध समुदायांवर अत्याचार करणारे गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचे खून हे एका वैचारिक भूमिकेतून झाले आहेत. सरकार आणि तपास यंत्रणांनी या खुनांच्या मागील खरे सूत्रधार कोण आहेत हे शोधून त्यांना समाजासमोर आणले पाहिजे.”

डॉक्टर दाभोलकरांच्या अभिवादन गीताने निर्भय मॉर्निंग वॉकची सांगता झाली. यावेळी कॉ. दिलीप पवार, कॉ. सुभाष जाधव यांची भाषणे झाली. राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती यांनी आभार मानले. यावेळी संघसेन जगतकर, कपिल मुळे, अनिल शेलार, स्वाती कृष्णात, मानसी बोळूरे, वैष्णवी पोतदार, कैवल्य शिंदे, प्रा. डॉ. अरुण शिंदे, प्रा. मांतेश हिरेमठ, प्रा बृहस्पती शिंदे, मोहित पोवार, मुक्ता निशांत, प्रतिज्ञा कांबळे, माधुरी बोळूरे, मोहसीन मोमीन, रमेश आपटे, राहुल सुतार, सरदार काळे, राहुल सावर्डेकर, संदीप शितोळे, यश आंबोळे, अभिषेक मिठारी, ऋषिकेश पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

ICAR : नागपूर येथे NBSSLUP अंतर्गत लिपिक, सहाय्यक पदांची भरती

धुळे येथे मनरेगा अंतर्गत 100 पदांची भरती; 8वी, 10वी उत्तीर्णांना संधी! 

NFSC : नागपूर येथे नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती 

Arrest the masterminds of Dabholkar's murder
Arrest the masterminds of Dabholkar's murder
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय