Saturday, April 27, 2024
Homeसंपादकीयव्हॅलेंटाईन डे ला किस (kiss) करावा की नाही ? काय आहेत किस...

व्हॅलेंटाईन डे ला किस (kiss) करावा की नाही ? काय आहेत किस चे शास्त्रीय फायदे तोटे ,जाणून घ्या…

पुणे : सध्या ‘व्हॅलेंटाईन वीक’ सुरू आहे. ‘चॉकलेट डे’, ‘रोझ डे’, ‘हग डे’ ‘किसिंग डे’ व आज (14 फेब्रुवारी) ‘व्हॅलेंटाइन डे’ आहे.किसिंग ही परदेशातील संस्कृती असं बरेच जण मानतात, मात्र त्याला हजारो वर्षांची परंपरा आहे. त्याची काही शास्त्रीय कारणं आहेत. तसंच काही फायदे व तोटेही आहेत.

किस म्हणजे चुंबन घेण्यामागे काही शास्त्रीय कारणं असतात. ती प्रक्रिया समजून घेतली पाहिजे. शास्त्रज्ञांच्या मते, 10 सेकंदांचं चुंबन घेतलं, तर आठ कोटी बॅक्टेरियांची देवाण-घेवाण होते. त्यामुळे त्याचे काही फायदे तर काही तोटेही असतात. असं म्हणतात, की किसिंगपेक्षा जास्त हात हातात घेतल्यानं जंतूसंसर्ग होण्याची शक्यता असते. टेक्सासच्या ए अँड एम विद्यापीठातील अँथ्रॉपॉलॉजिस्ट वागन ब्रियांट यांच्यामते, 3500 वर्षांपूर्वीच्या संस्कृतीतील ग्रंथांमध्ये चुंबन या शब्दाचे उल्लेख आढळले आहेत. हिंदू, जैन आणि बौद्ध या तिन्हीशी संबंधित प्राचीन ग्रंथांमध्ये तसे उल्लेख आहेत.

चुंबन देण्याची कृती मनात सकारात्मक भावना निर्माण करते. अगदी बाल्यावस्थेतच याचे धडे गिरवले जातात. दूध पिण्याकरता बाळ ज्या पद्धतीने ओठांचा वापर करतं, तो याचा पूर्वपाठ असतो. या सुरुवातीच्या गोष्टीच मुलांच्या मेंदूत न्यूरल/ नसांशी संबंधीत मार्ग तयार करतात. ओठ हे कामभावना उत्पन्न करणाऱ्या शरीरातील अवयवांपैकी एक प्रमुख अवयव आहेत. प्राण्यांपेक्षा माणसांचे ओठ बाहेर आलेले असतात. त्यात अनेक संवेदनशील पेशी असतात. त्यामुळेच त्यांना थोडासा जरी दुसऱ्या ओठांचा स्पर्श झाला, की लगेचच संदेश मेंदूपर्यंत जातो व माणसाला छान वाटतं.



चुंबन घेतल्यामुळे आपल्या मेंदूतील एक भाग अचानक सक्रिय होतो. त्यापुढे काय घडू शकतं, याचा विचार आपल्या मनात येऊ लागतो. त्यामुळे शरीरातील हॉर्मोन्स आणि न्यूरोट्रान्समीटर्स सक्रिय होतात. त्याचा आपले विचार आणि भावनांवर प्रभाव पडतो. दोन व्यक्ती जेव्हा किस करतात, तेव्हा सरासरी नऊ मिलिग्रॅम पाणी, सात मिलिग्रॅम प्रोटिन्स, 18 मिलिग्रॅम ऑरगॅनिक कंपाउंड्स, 71 मिलिग्रॅम वेगवेगळे फॅट्स, 45 मिलिग्रॅम सोडियम-क्लोराइड याची देवाणघेवाण होते. किसिंगमुळे कॅलरी बर्न होतात. असं म्हणतात, की किस करणारं जोडपं 2 ते 26 कॅलरीज प्रतिमिनिट खर्च करतात. हा आनंद मिळवताना 30 वेगवेगळ्या मांसपेशींचा वापर केला जातो.

पाश्चिमात्य देशांमध्ये किसिंगची सुरुवात साधारणपणे दोन हजार वर्षांआधीपासून झाली. 2015 च्या एका अभ्यासाच्या मते, जगभरातील 168 संस्कृतींपैकी निम्म्यापेक्षाही कमी संस्कृतींमध्ये ही ओठांवर ओठ टेकवण्याची चुंबनाची पद्धत स्वीकारली गेली आहे. अनेक संस्कृतींमध्ये याला आजही पाप समजलं जातं. काही वर्षांपूर्वी लागलेल्या एका शोधात असं म्हटलंय, की जगातलं पहिलं चुंबन भारत किंवा इजिप्तमध्ये घेण्यात आलं असावं.

किसिंगबाबत अनेक अभ्यास व संशोधनं करण्यात आली आहेत. एक अभ्यास सांगतो, की स्त्रिया त्यांचा जोडीदार निवडताना त्याच्या चुंबन घेण्याच्या पद्धतीवर बराच विचार करतात. चुंबनामुळे दोन व्यक्ती एकमेकांच्या इतक्या जवळ येतात, की ते एकमेकांचे फेरोमोन्सही तपासू शकतात. फेरोमोन्स हे वेगवेगळे गंध निर्माण करणारं एक रसायन आहे. हे रसायन प्राण्यांमध्ये जास्त सक्रिय असतं. मात्र दोन व्यक्तींना जवळ आणण्याबाबतही ते काम करतं. याचाच अर्थ एका व्यक्तीला दुसऱ्यापासून वेगळी ओळख देणाऱ्या त्या वासाची जाणीव किस करताना होते. काही वेळा तो वास आवडतो, तर काही वेळा आवडत नाही.



चुंबन घेण्याच्या क्रियेला एक सुखकारक क्रिया असं मानलं गेलंय. शारीरिक संबंधांकरता ते गरजेचं समजलं जातं. एकमेकांमध्ये प्रेमभावना टिकून राहण्यासाठीही ते महत्त्वाचं समजलं जातं. जोडीदाराला किस केल्यामुळे मेंदूला शांत करणारी रसायनं निर्माण होतात. यामुळे ताण कमी होतोच शिवाय ताजंतवानंही वाटतं. सायकॉलॉजी टुडेच्या मते, माणूस आयुष्यातली 20,160 मिनिटं जोडीदाराला किस करण्यात व्यतीत करतो. सर्वसाधारणपणे पुरुष सेक्सच्या आधी किस करणं पसंत करतात, तर स्त्रियांना सेक्सनंतर किस करायला आवडतं.

किस केल्यामुळे कॅलरी बर्न होतात, यामुळे चयापचय वाढतो. एक झटपट चुंबन 2-3 कॅलरी बर्न करतं, तर थोडं तीव्र चुंबन 5 कॅलरी बर्न करतं. किस करण्याचा वेळ व पद्धत यावर हे अवलंबून असतं. आपल्या तोंडातील लाळेमध्ये बॅक्टेरिया व विषाणूंशी लढणारे पदार्थ असतात. त्यामुळे किस केल्यामुळे आपले दात, हिरड्या व तोंडाचं आरोग्य चांगलं राहतं. जोडीदाराच्या तोंडातील जंतूंशी संपर्क झाल्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

मात्र किस केल्यामुळे काही आजारांचा सहज संसर्ग होऊ शकतो. घसा आणि नाकातील द्रव्याद्वारे हे आजार पसरू शकतात. काही संसर्ग झालेले ड्रॉपलेट हवेतही असतात. ते श्वासाद्वारे तुमच्या शरीरात गेल्यास माणसं आजारी पडता. नाक आणि घशातले काही संक्रमित कण त्यांच्या छोट्या आकारामुळे बराच काळ हवेत राहू शकतात. त्यांना ड्रॉपलेट नुक्लीआय असं म्हटलं जातं. ते कण सरळपणे फुफ्फुसात प्रवेश करू शकतात व आजार निर्माण करू शकतात.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय