Saturday, October 12, 2024
Homeसंपादकीयकव्हर स्टोरीव्हिडियो : अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारात मृत्यू; FB लाईव्हनंतर हल्लेखोराचीही आत्महत्या

व्हिडियो : अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारात मृत्यू; FB लाईव्हनंतर हल्लेखोराचीही आत्महत्या

दहिसर : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबाराची घटना ताजी असताना मुंबईत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार करण्यात आला.यामध्ये अभिषेक घोसाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अभिषेक हे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पूत्र आहेत. दरम्यान, हल्लेखोरानेही स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक घोसाळकर, हे शिवसेना नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे ते चिरंजीव असून उपचारासाठी त्यांना करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनेनंतर शिवसेनेच्या यूबीटी गटाच्या शिवसनिकांनी निषेधार्थ मॉरीसच्या कार्यालयाची पूर्णपणे तोडफोड करण्यात आली आहे.

या घटनेनंतर दहिसर परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो यामुळे या ठिकाणी आता अतिरिक्त पोलिस बळ मागवत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.हल्लेखोर मोरीस याचाही मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अभिषेक यांची हत्या ही पूर्वनियोजित असल्याचा तपास अधिकाऱ्यांचा संशय असून दहिसर पोलीस तसेच क्राइम ब्रांच या प्रकरणी तपास करत आहे.



कोण आहे गोळीबार करणारा मॉरिस?


मॉरिस नावाचा इसम दहिसर- बोरिवली परिसरात स्वयंसेवी संघटना चालवत असल्याची माहिती आहे. स्थानिक राजकीय वर्तृळात मॉरिस नावाच्या व्यक्तीला स्वयंघोषित नेता म्हणून ओळखले जायचे. गणपत पाटील नगरमध्ये मॉरिस काम करत होता.

राज्यात गुंडांचं सरकार, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अभिषेक घोसाळकर आताच माझ्यासोबत मातोश्रीवर बैठक करून गेले. आता बातमी आली त्याच्यावर गोळीबार झाला. काय चाललय या राज्यात? गुंड्याचं सरकार बसलंय. एका आमदाराने गोळी घातली, ती पण पोलीस स्टेशनमध्ये. दोन्ही बाजूने गुंडागर्दी चालू आहे, हे सरकार उलथून लावावं लागेल. मिंधेला बदनाम करायची गरज नाही, ते बदनामच आहे, पण त्यामुळे महाराष्ट्र बदनाम होतोय.

संबंधित लेख

लोकप्रिय