Wednesday, May 22, 2024
Homeसंपादकीयकव्हर स्टोरीमटारच्या शेंगांची टरफलं फेकून देता? झाडांसाठी खत करण्याचा खास उपाय, झाडं वाढतील...

मटारच्या शेंगांची टरफलं फेकून देता? झाडांसाठी खत करण्याचा खास उपाय, झाडं वाढतील जोमाने व्हिडिओ पाहा

हिवाळ्यात दिवसांत बाजारात मटारच्या शेंगा खूप जास्त प्रमाणात येत असतात. याच ऋतुमध्ये ताजे मटार मिळतात. त्यामुळे आपणही मग ते भरपूर प्रमाणात घेतो आणि वेगवेगळ्या रेसिपींमध्ये वापरतो.ताजे दाणे आपण खातो आणि शेंगांची टरफलं मात्र सरळ कचऱ्यात टाकून देतो. पण आपल्यासाठी कचरा असणारा हा पदार्थ झाडांसाठी अतिशय उपयुक्त आहे. ज्याप्रमाणे केळीच्या साली, कांद्यांची टरफलं यांचं पाणी झाडांसाठी एक उत्तम टॉनिक असतं, त्याचप्रमाणे मटारच्या शेंगांची टरफलं (How to use matar peels for gardening?) देखील झाडांसाठी एक मॅजिकल वाॅटर ठरू शकतं (Uses of matar peels for plants in marathi). आता मटारच्या शेंगांचा झाडांसाठी कसा वापर करायचा ते पाहूया…

झाडांसाठी मटारच्या शेंगांच्या टरफलांचा उपयोगहा प्रयोग करण्यासाठी मटारच्या शेंगांच्या टरफलांचे बारीक तुकडे करून घ्या आणि हे सगळे तुकडे थोडेसे पाणी घालून मिक्सरमधून वाटून घ्या.आता या वाटणामध्ये थोडं पाणी घाला आणि ते गाळणीने गाळून घ्या. साधारणपणे हे पाणी जेवढं असेल त्याच्या आणखी तीनपट पाणी त्यात टाका आणि हे पाणी थोडं थोडं करून सगळ्या झाडांना घाला. मटारचे वाटण गाळून घेतल्यानंतर गाळणीत जो चोथा उरला असेल तो चोथा वाळवा आणि नंतर कुंडीतल्या मातीत थोडा- थोडा करून टाकून द्या. यामुळेही झाडांना फायदा होईल.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय