Wednesday, June 19, 2024
Homeताज्या बातम्याSambit Patra : ‘देवाला बनवले पंतप्रधान मोदींचे भक्त’ भाजप नेते संबित पात्रा...

Sambit Patra : ‘देवाला बनवले पंतप्रधान मोदींचे भक्त’ भाजप नेते संबित पात्रा यांचे वादग्रस्त विधान

Sambit Patra : ओडिशातील पुरी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संबित पात्रा यांनी वादग्रस्त विधान केले आहे. पात्रा यांनी भगवान जगन्नाथ यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भक्त म्हटले होते. पात्रा यांच्या या विधानाने सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली आहे. यावरून आता विरोधी पक्षांनी भाजपाला घेरले आहे. संबित पात्रा (Sambit Patra) यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

भाजप नेते संबित पात्रा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते रोड शो दरम्यान बोलताना भगवान जगन्नाथ यांना पंतप्रधान मोदींचे भक्त म्हणत आहेत. वाद वाढत असताना, संबित पात्रा यांनी स्पष्ट केले की त्यांची जीभ घसरली त्यांना पीएम मोदींना भगवान जगन्नाथाचे भक्त म्हणायचे होते. संबित पात्रा यांच्या या विधानानंतर विरोधी पक्षांनी त्यांना चांगलेच घेरले आहे.

Sambit Patra यांच्यावर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका

विरोधी पक्षांकडून जोरदार टीका होत असताना संबित पात्रा यांनी एक व्हिडीओ शेअर करत माफी मागितली आहे. पात्रा यांनी म्हटले आहे की, महाप्रभू श्री जगन्नाथ जी यांच्याबाबत माझ्याकडून झालेल्या चुकीमुळे आज माझी सद्सद्विवेकबुद्धी अत्यंत दुखावली आहे. मी महाप्रभू श्री जगन्नाथजींच्या चरणी मस्तक टेकून क्षमा मागतो. तसेच पश्चात्ताप करून माझी चूक सुधारण्यासाठी मी पुढील ३ दिवस उपोषण करणार आहे. असेही त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे सांगितले की, महाप्रभू श्री जगन्नाथ हे विश्वाचे भगवान आहेत. महाप्रभूंना मानवाचे भक्त म्हणणे म्हणजे ईश्वराचा अपमान असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की, अशा विधानांमुळे जगभरातील जगन्नाथ भक्त आणि उडिया लोकांच्या भावना आणि श्रद्धा दुखावल्या आहेत.

आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी X वर पोस्ट करत म्हटले की, “मी भाजपच्या या विधानाचा तीव्र निषेध करतो. ते देवाच्या वर आहे असे समजू लागले आहे. ही अहंकाराची उंची आहे. देवाला मोदी भक्त म्हणणे हा देवाचा अपमान आहे. अशी टीका केजरीवाल यांनी केली आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला अटक, वाचा अपघातातील धक्कादायक बाबी

ब्रेकिंग : आज १२ वीचा निकाल, इथे पहा निकाल !

राज्यात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान

अलिशान कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू ; निबंध लिहिण्यासह इतर अटी टाकत 15 तासांत जामीन मंजूर

धक्कादायक : एकाच तरूणाने केले ८ वेळा मतदान, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

ब्रेकिंग : इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती

मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई

२० दिंडोरी, २१ नाशिक लोकसभा मतदारसंघांसाठी आज मतदान

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय