Saturday, July 27, 2024
Homeजुन्नरNarayangaon येथे महादेव बेटिंग ऍप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, 70 ते 80...

Narayangaon येथे महादेव बेटिंग ऍप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, 70 ते 80 जण ताब्यात

Narayangaon : महादेव बेटिंग ऍप प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नारायणगाव (Narayangaon) येथे छापेमारी केली आहे. नारायणगावात पोलिसांनी कारवाई करत महाराष्ट्र कनेक्शन उघड केले आहे. नारायणगावातील एका इमारतीत महादेव बेटिंग ऍपचे काम सुरू होते. या प्रकरणात तब्बल 70 ते 80 जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशभरात महादेव बेटिंग ऍप प्रकरण गाजत आहे. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या अर्थातच ईडीने (ED) देशातील विविध राज्यांत धाडी टाकत कारवाई केली आहे. असताना पुण्याच्या नारायणगावमध्ये पोलीसांनी छापेमारी करत तब्बल ७० जणांना ताब्यात घेतले आहे.

महादेव ऑनलाईन बेटिंग प्रकरणी परदेशासह देशातील काही राज्यांमध्ये छापेमारी करत कारवाई करण्यात आली होती. महादेव बुक अॅप प्रकरणाच्या तपासादरम्यान, ईडीला दररोज नवी माहिती मिळत आहे. या संदर्भात ईडीनं अनेक बॉलिवूड कलाकारांना समन्स बजावलं आणि त्यांची चौकशी सुरू आहे. अशात आता महादेव ऑनलाइन बेटिंग ऍपचे काम पुण्याच्या नारायणगावामधून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर पुणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नारायणगाव येथे छापेमारी केली आहे.

महादेव बुक अॅपवर बंदी

अंमलबजावणी संचालनालयाच्या अर्थातच ईडीच्या (ED) विनंतीवरून केंद्र सरकारने महादेव बेटिंग अॅपवर (Mahadev Betting App) बंदी घातली आहे.

Narayangaon येथे पोलिसांचा छापा

पोलिसांनी या इमारतीत छापा टाकला त्यावेळी 70 ते 80 जणांना ताब्यात घेण्यात आले. तसेच अख्खी इमारतच महादेव एप संदर्भातील कामासाठी वापरली जात असल्याचे पुढे आले. सध्या ताब्यात घेण्यात आलेल्यांची चौकशी सुरू आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

Tourism : उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जा, दक्षिण भारतात

POK : हैं हक्क हमारा आझादी, पाकव्याप्त काश्मिरी जनता रस्त्यावर

मोठी बातमी : मुंबईत वादळी पावसाने होर्डिंग कोसळून ३ ठार, १०० अडकले

Rain : मुंबई, ठाणे येथे मुसळधार सुरू

बाकी कंपन्यांचे उडाले होश, ‘ही’ कंपनी देशात आणतेय जगातील पहिली CNG बाईक

अफगाणिस्तानात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात ३०० हून अधिक मृत्यू, हजारो विस्थापित

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय