Wednesday, May 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

PCMC : छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

पिंपरी चिंचवड : सेवा सारथी फाउंडेशन यांच्यावतीने छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद देला. यावेळी ५० शंभूभक्तांनी रक्तदान केले. शनी मंदिर ग्राउंड, पूर्णानगर येथे सेवा सारथी फाउंडेशन यांच्यावतीने छत्रपती संभाजीराजे जयंतीनिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते.

शाहूनगर येथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जन्मोत्सव समिती व आधार ब्लड बँक यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक रक्तदात्याला पाच लाखाचा अपघाती विमा विनामूल्य काढून देण्यात आले. शंभूभक्तांनी त्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले. pcmc

कार्यक्रम शिबिरासाठी सेवा सारथी फाऊंडेशनचे अध्यक्ष ओंकार मांडगे यांनी विशेष परिश्रम घेतले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय