Saturday, July 27, 2024
Homeराज्यRain : मुंबई, ठाणे येथे मुसळधार सुरू

Rain : मुंबई, ठाणे येथे मुसळधार सुरू

राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम वाढणार Rain

मुंबई : आज सोमवार दुपारी ३ वा मुंबई शहराला प्रथमच अवकाळी पावसाने झोडपले, मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, बदलापूर परिसरात जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणी तुंबून अनेक ठिकाणी वाहतूक थांबली, मुंबईतील मेट्रो वन ची सेवा ठप्प झाली आहे. वर्सोवा ते घाटकोपर दरम्यानची मेट्रोची वाहतूक ठप्प झाली आहे. अचानक सुरू झालेल्या पावसाने शहरवासीयांची तारांबळ उडाली.

अंबरनाथ आणि बदलापूर भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारा देखील पडल्या. मात्र उच्च तापमानात होरपळणाऱ्या मुंबई, ठाणे येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नवी मुंबई सह रायगड जिल्ह्यात अचानक पाऊस सुरू झाला आहे. Unseasonal rain

हवामान विभागाने राज्यामध्ये येत्या 4-5 दिवसांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे,
तर मध्य महाराष्ट्र, मध्य मराठवाडा, विदर्भ काही भाग, दक्षिण कोकण मधील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण झाले आहे. या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस (stormy rain) होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रामध्ये मागील तीन दिवसापासून पाऊस पडत आहे. पुणे, कोल्हापुर, सातारा, नाशिक, सांगली, जालना, संभाजीनगर आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये तसेच विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. Weather news

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

Tourism : उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जा, दक्षिण भारतात

POK : हैं हक्क हमारा आझादी, पाकव्याप्त काश्मिरी जनता रस्त्यावर

मोठी बातमी : मुंबईत वादळी पावसाने होर्डिंग कोसळून ३ ठार, १०० अडकले

Rain : मुंबई, ठाणे येथे मुसळधार सुरू

बाकी कंपन्यांचे उडाले होश, ‘ही’ कंपनी देशात आणतेय जगातील पहिली CNG बाईक

अफगाणिस्तानात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात ३०० हून अधिक मृत्यू, हजारो विस्थापित

Condom : अबब अजबच ! तरुणाईला लागले फ्लेव्हर्ड कंडोमचं पाणी पिण्याचे व्यसन ?

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय