Saturday, July 27, 2024
Homeराज्यHoarding Collapses : मुंबईत वादळी पावसाने होर्डिंग कोसळून ३ ठार, १०० अडकले

Hoarding Collapses : मुंबईत वादळी पावसाने होर्डिंग कोसळून ३ ठार, १०० अडकले

Hoarding Collapses : आज मुंबई शहरात अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. पाऊस पडण्यापुर्वी धुळीचे मोठे लोट आणि सोसाट्याच्या वारा सुटला होता. पावसापासून आसरा घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकं तेथे आली, त्यामुळे या लोखंडी होर्डिंगच्या खाली मोठ्या प्रमाणात लोकं अडकली आहेत. सध्या अग्निशमन दलाकडून बचाव कार्य हाती घेण्यात आले.

घाटकोपरमध्ये BPCL पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळून मोठा अपघात झाला आहे. घाटकोपर छेडा नगर येथे १२० बाय १२० फुटांचे बेकायदा महाकाय होर्डिंग सोमवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास जवळील पेट्रोल पंपावर कोसळले. या दुर्घटनेत होर्डिंग खाली अडकलेल्या १०० लोकांना रेस्क्यू केले. मात्र दुर्घटनेत ५४ जण जखमी झाले असून जखमींना जवळील राजावाडी रुग्णालयात दाखल केले आहे. या दुर्घटनेत ३ जण मृत्युमुखी पडल्याचे वृत्त आहे. Hoarding Collapses

दरम्यान, रेल्वे हद्दीत महाकाय होडिॅग बेकायदा असल्याने जीआरपी व कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत.

मुंबई मध्ये घाटकोपर येथील दुर्घटनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशीचे आदेश दिल्याचं X वर ट्वीट करत सांगितले आहे. सध्या मुंबई पोलिस, अग्निशमन दल, महानगर गॅस लिमिटेड, महानगरपालिका व इतरांचे मदतीने अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचे काम चालू आहे. सध्या घटनास्थळी NDRF ची देखील एक टीम तैनात करण्यात आली आहे. Mumbai news

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

Tourism : उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जा, दक्षिण भारतात

POK : हैं हक्क हमारा आझादी, पाकव्याप्त काश्मिरी जनता रस्त्यावर

मोठी बातमी : मुंबईत वादळी पावसाने होर्डिंग कोसळून ३ ठार, १०० अडकले

Rain : मुंबई, ठाणे येथे मुसळधार सुरू

बाकी कंपन्यांचे उडाले होश, ‘ही’ कंपनी देशात आणतेय जगातील पहिली CNG बाईक

अफगाणिस्तानात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात ३०० हून अधिक मृत्यू, हजारो विस्थापित

Condom : अबब अजबच ! तरुणाईला लागले फ्लेव्हर्ड कंडोमचं पाणी पिण्याचे व्यसन ?

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय