Monday, June 16, 2025
---Advertisement---
---Advertisement---

CNG bike : बाकी कंपन्यांचे उडाले होश, ‘ही’ कंपनी देशात आणतेय जगातील पहिली CNG बाईक

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात होणार निर्मिती

आपण CNG कारबद्दल ऐकलं असेल, पण CNG बाईकबद्दल कधी ऐकलंय का? नसेल तर आता सवय करून घ्यायला हरकत नाही. कारण भारतात CNG बाईक लॉन्च होणार आहे. भारतातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी बजाज ऑटो नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे. 18 जून 2024 रोजी कंपनी देशातील पहिली CNG बाईक लॉन्च करणार आहे. बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या या बाईकच्या लॉन्चची तारीख अधिकृतपणे निश्चित झाली आहे. बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज (Rajiv Bajaj) यांनी Pulsar NS400Z च्या लॉन्च इव्हेंटमध्ये या CNG बाईकच्या लॉन्च तारखेबद्दल माहिती दिली आहे. कंपनीसाठी ही बाईक महत्त्वपूर्ण ठरेल आणि भारतातील मोटरसायकल उद्योगात परिवर्तन घडवून आणण्यास मदत होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.CNG bike

---Advertisement---


CNG वर चालणारी देशातील पहिली बाईक बजाज ब्रुझर:


मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीएनजीवर चालणारी ही बाइक बजाज ब्रुझर 125 सीएनजी (Bajaj Bruzer 125 CNG) नावानं बाजारात आणली जाईल. Bajaj Bruzer 125 CNGमध्ये 125cc इंजिन असेल. हे इंजिन CNG वर चालेल. ही बाईक पेट्रोल बाईकच्या निम्म्या किमतीत धावेल असा कंपनीचा दावा आहे.CNG bike


बजाज ब्रुझर 125 CNG ठरणार गेमचेंजर
:

Bajaj Bruiser 125 CNG भारतात CNG वाहनांना प्रोत्साहन देऊ शकते. पेट्रोल बाईकपेक्षा स्वस्त आणि परवडणारी असल्याने ही बाईक ग्राहकांना आकर्षित करू शकते. पर्यावरणपूरक असण्यासोबतच ही बाईक ग्राहकांना परवडणारी असेल. CNG बाईक एकदा भरल्यावर पेट्रोल बाईकपेक्षा जास्त अंतर कापू शकते. बजाज ऑटोची ही पहिली सीएनजी बाईक भारतीय ऑटोमोबाईल उद्योगासाठी गेम चेंजर ठरू शकते. या बाईकमुळे इंधनाचा खर्च तर कमी होईलच पण प्रदूषणही कमी होईल. अशा परिस्थितीत ही बाईक १८ जून रोजी लॉन्च होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. तथापि, ही नवीन तंत्रज्ञानावर चालणारी बाईक आहे, त्यामुळे ब्रुझरची परफॉर्मन्स नेमका कसा असेल, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.CNG bike

---Advertisement---


किंमतीबद्दल बोलायचं झाल्यास, भारतीय बाजारपेठेत बजाज ब्रुझर 125 सीएनजीची किंमत 90,000 ते 1,10,000 रुपयांच्या दरम्यान असू शकते. बाईकमध्ये एक मोठी इंधन टाकी, एक मोठी सीट, रुंद ग्रॅब रेल आणि निकेल गार्डने सुसज्ज हँडलबार देण्यात आला आहे. यामुळं ही CNG बाईक आरामदायी आणि लांब पल्ल्यासाठी उत्तम असेल. बजाज ऑटो जगातील पहिली सीएनजी मोटारसायकल विकसित करीत आहे. बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी याबाबत माहिती दिली. तसेच येत्या जून महिन्यात ही मोटारसायकल लॉन्च होईल, असेही त्यांनी सांगितले. राजीव बजाज यांनी पुढील पाच वर्षांत कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी बजाज समूहाच्या ५ हजार कोटी रुपयांच्या वचनबद्धतेबद्दल बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. सध्या इंधनाचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे बजाजची ही सीएनजी मोटारसायकल बाजारात दाखल होताच धुमाकूल घालेल, अशी अपेक्षा आहे.CNG bike

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles