Tuesday, May 21, 2024
Homeआंतरराष्ट्रीयClimate change : अफगाणिस्तानात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात ३०० हून अधिक मृत्यू ,...

Climate change : अफगाणिस्तानात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात ३०० हून अधिक मृत्यू , हजारो विस्थापित

पुणे : अफगाणिस्तानात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात ३०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून एक हजारांहून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या अन्न संस्थेने शनिवारी दिली. जागतिक अन्न कार्यक्रमाने म्हटले आहे की, गेल्या काही आठवड्यांपासून अफगाणिस्तानात मुसळधार पाऊस होत आहे.अतिवृष्‍टीमुळे आलेल्‍या महापूराचा मोठा फटका उत्तर अफगाणिस्‍तानला बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीमधील मृतांची संख्‍या ३१५वर पोहली असून १,६०० हून अधिक नागरिक जखमी झाल्‍याचे वृत्त ‘रॉयटर्स’ने तालिबान संचलित निर्वासित मंत्रालयाच्‍या हवाल्‍याने दिले आहे.Climate change


उत्तर अफगाणिस्‍तानला शुक्रवार, १० मे रोजी मुसळधार पावसाने झोडपले. महापुरामध्‍ये पहिल्‍याच दिवशी १५३ हून अधिक नागरिक मृत्‍युमुखी पडले होते. आज तालिबान संचलित निर्वासित मंत्रालयाच्‍या हवाल्‍याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्टमध्ये उत्तर बागलान प्रांतातील प्रांतीय कार्यालयातील आकडेवारी जाहीर केली. अतिवृष्‍टीनंतर आलेल्‍या महापुरामुळे हजारो घरांचे मोठे नुकसान झाले आहे. नागरिकांबरोबर जनावरांनाही याचा फटका बसला आहे. पुरामुळे आरोग्य सेवा सुविधाही पूर्णपणे कोलमडली आहे.Climate change: More than 300 dead, thousands displaced in floods caused by heavy rains in Afghanistan dis place ment


हवामान बदलासाठी अफगाणिस्‍तान सर्वात असुरक्षित देशांपैकी एक

मागील काही वर्ष हवामान बदलासाठी सर्वात असुरक्षित देशांपैकी एक अफगाणिस्‍तान असल्‍याचे संयुक्‍त राष्‍ट्रांनी जाहीर केले आहे. तालिबानचे अर्थव्यवस्था मंत्री दिन मोहम्मद हनिफ यांनी आज (दि.१२) एका निवेदनाच्‍या माध्‍यमातून संयुक्‍त राष्‍ट्र, जगभरातील मानवतावादी संस्थांनी पूरग्रस्‍तांना मदत करावी, असे आवाहन केले आहे. बागलान प्रांताबरोबरच ईशान्य, मध्य घोर आणि पश्चिम हेरातमधील बदख्शान प्रांताला देखील महापुराचा फटका बसला आहे. या भागातही मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. बागलान प्रांतामध्ये 200 हून अधिक लोकांचा मृत्‍यू झाला आहे. हजारो घरे उद्ध्वस्त झाली आहेत.Climate change


हवाई दलाचे मदतकार्य सुरु

हवाई दलाच्‍या मदतीने पूरग्रस्‍तांना बाहेर काढण्यास येत आहे. 100 हून अधिक जखमी लोकांना लष्करी रुग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे. पूरग्रस्‍त नागरिकांना औषध आणि प्रथमोपचार वितरित करण्यास सुरुवात केली आहे,’ असेही तालिबान सरकारने आपल्‍या निवेदनात नमुद केले आहे. बागलानच्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख हेदायतुल्ला हमदर्द यांनी ‘एएफपी’ला सांगितले की, पूरग्रस्‍तांच्‍या बळींचा आकडा वाढू शकतो.Climate change in afganistan displacement

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय