Sunday, December 8, 2024
HomeNewsमोठी बातमी : Luna-25 हे यान चंद्रावर कोसळलं, चंद्र मोहिमेला मोठा धक्का

मोठी बातमी : Luna-25 हे यान चंद्रावर कोसळलं, चंद्र मोहिमेला मोठा धक्का

नवी दिल्ली : रशियाच्या (Russia) चंद्रमोहिमेबाबत (Moon Mission) एक मोठी अपडेट समोर आली आहे. रशियाच्या चांद्र मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. रशियाचे Luna-25 यान चंद्रावर क्रॅश झाले आहे. रशियन अंतराळ संशोधन संस्था रोसकॉसमॉस (Roskosmos) ने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.

रशियानं 47 वर्षांनंतर पहिल्यांदाच मून मिशन हाती घेतले होते. रशियाचे Luna-25 हे यान भारतीय वेळेनुसार 11 ऑगस्ट मध्यरात्री 3.30 वाजता अवकाशात झेपावले. एका शक्तिशाली रॉकेटच्या मदतीने अवघ्या 5 दिवसांमध्ये लूना चंद्राच्या कक्षेत पोहोचलं होतं. Luna-25 हे 21 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करणार होते. मात्र रशियाच्या मिशन लुना-25 मध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यानंतर आता रशियाचे Luna-25 यान चंद्रावर क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा पहिला देश ठरण्याचं रशियाचं स्वप्न भंगलं आहे.

रशियाचं लुना-25 अंतराळयान 21 ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करणार होतं. कक्षा बदलताना लुना-25 आपत्कालीन परिस्थितीत अडकले होते. लूना-25 कक्षा बदलण्याताना अयशस्वी झाल्याने त्यामुळे ते भरकटले. त्याचा मुळ मार्ग गमावला. रशियाची मून मोहिम देखील अंतिम टप्प्यात आली असताना यानच क्रॅश झाले आहे. रशियन स्पेस एजन्सी लुना-25 शी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय