Wednesday, May 22, 2024
Homeजुन्नरJunnar : दिव्यांग मतदारांना मतदान करण्याचे आवाहन, दिव्यागांच्या अडचणींवर चर्चा

Junnar : दिव्यांग मतदारांना मतदान करण्याचे आवाहन, दिव्यागांच्या अडचणींवर चर्चा

Junnar : जुन्नर तालुक्यातील जुन्नर नगरपरिषद हद्दीतील दिव्यांगांना तसेच जेष्ठ नागरिकांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी त्रास होऊ नये यासाठी बुथ पर्यंत ने आण करण्यासाठी गाडीची सोय करण्यात आल्याची माहिती जुन्नर नगरपरिषदेचे प्रशासकीय मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी दिली.

शिरूर लोकसभा मतदार संघात 13 मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या प्रक्रियेसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. मतदानाच्या दिवशी दिव्यांग व जेष्ठ नागरिकांना त्रास होवू नये यासाठी जुन्नर नगरपरिषदेचे प्रशासकीय मुख्याधिकारी संदीप भोळे यांच्या मार्गदर्शनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी दिव्यांग नागरिकांच्या अडअडचणींवर चर्चा करण्यात आली.

जुन्नर शहरातील सर्व दिव्यांग मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. अंध लोकांना ब्रेनलिपिची माहिती मतदान मशीनवर दिली तसेच मुकबधीर, दिव्यांग लोकांना सर्व सुविधा पुरवण्यात येणार आहे तरी सर्व दिव्यांग लोकांनी जास्तीज जास्त मतदान करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. मतदान केंद्रात व्हीलचेअर व रॅपची सोय करण्यात आली असून अधिकारी स्वयंसेवक व पदाधिकारी सर्व दिव्यांग व जेष्ठ नागरिकांना मदत करणार आहे.

तहसील कार्यालय व जुन्नर नगरपरिषदेकडून दिव्यांग व जेष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी स्वयंसेवकांची निवड करण्यात आली आहे. स्वयंसेवक घरापासून ते मतदान केंद्रापर्यंत ने आण करण्यात मदत करणार आहे.

यावेळी जुन्नर नगरपरिषद दिव्यांग कक्ष अधिकारी चित्रा औटी व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केंद्रचे संस्थापक अध्यक्ष दीपक चव्हाण, अध्यक्ष अरुण शेरकर यांनी दिव्यांग लोकांना येणाऱ्या विविध अडचणी व सुविधाबाबत चर्चा केली. त्यावेळी राहुल मुसळे यांच्या अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय