Tuesday, May 21, 2024
HomeराजकारणKejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

नवी दिल्ली : नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टानं दिल्लीच्या कथित मद्यधोरण प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर केला आहे. 1 जूनपर्यंत हा अंतरीम जामीन मंजूर करण्यात आला आहे. अरविंद केजरीवाल यांनी ईडीकडून करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपांकर दत्ता यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने ईडीला (ED) प्रश्न विचारले. निवडणुकीच्या आधीच अटकेची कारवाई कशासाठी? कारवाई आणि अटकेत इतकं अंतर का? असे अनेक प्रश्न कोर्टाने ईडीला विचारले.Kejriwal

दिल्लीत 25 मे रोजी लोकसभेसाठी सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. याआधी केजरीवाल यांना जामीन मिळाल्याने प्रचाराच्या धामधुमीत आपच्या कार्यकर्त्यांना प्रचारासाठी बळ मिळण्यास मदत होणार आहे. आज संध्याकाळपर्यंत केजरीवाल बाहेर येण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष आणि इंडिया आघाडीला मोठा दिलासा मिळाला आहे. Kejriwal

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 2 जून रोजी पुन्हा आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे. याचाच अर्थ केजरीवाल पुन्हा 2 जून रोजी तुरूंगात जाणार आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या बाजूचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांची 4 जून रोजी निकाल जाहीर होईपर्यंत अंतरिम जामीन देण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.Kejriwal

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील शरद पवार यांचे मोठे विधान

राज्यात ११ मतदारसंघात अंदाजे ६१.४४ टक्के मतदान

बारामतीत पोलिसांच्या ‘बंदोबस्तात’ पैशांचा पाऊस ? रोहित पवारांचे गंभीर आरोप

‘EVM’ मशीनच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्यास अटक

TMC : टाटा स्मारक हॉस्पिटल येथे भरती

मोठी बातमी : दिंडोरीतून माकपचे उमेदवार जे पी गावित यांचा उमेदवारी अर्ज मागे

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय