Sunday, May 19, 2024
Homeताज्या बातम्याBaramati : बारामतीत पोलिसांच्या ‘बंदोबस्तात’ पैशांचा पाऊस ? रोहित पवारांचे गंभीर आरोप

Baramati : बारामतीत पोलिसांच्या ‘बंदोबस्तात’ पैशांचा पाऊस ? रोहित पवारांचे गंभीर आरोप

Baramati : बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्यात प्रतिष्ठेची लढत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या आदल्या दिवशी मतदारांमध्ये पैसे वाटल्याचा आरोप होत आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

बारामती लोकसभा (Baramati) मतदारसंघात भोर तालुक्यात अजित पवारांचे कार्यकर्ते, आणि मावळमधील अजित पवार गटातील एका नेत्याचे कार्यकर्ते चक्क पोलीस बंदोबस्तात पैसे वाटत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. रोहित पवारांनी ट्विटमध्ये पोस्ट केलेल्या व्हिडीओत एका गाडीत ५०० रुपयांच्या नोटा आणि बॅग्स दिसून येत आहेत. अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांना काही दिवसांपूर्वी वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली. तर, वाय प्लस दर्जाची सुरक्षा याचसाठी हवी होती का? असा सवाल आमदार रोहित पवारांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

आमदार रोहित पवार यांनी X सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक व्हिडिओ पोस्ट करत अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. रोहित पवारांनी बारामतीत भोरमध्ये मतदारांना पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप केलाय. अजित पवार मित्रमंडळाकडून पैसे वाटप होत असल्याचा दावा त्यांनी केलाय.

दरम्यान अजित पवारांनी हे आरोप फेटाळलेत. आरोप करणाऱ्यांचं डोकं फिरल्याचा पलटवार अजित पवारांनी केलाय.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : दिंडोरीतून माकपचे उमेदवार जे पी गावित यांचा उमेदवारी अर्ज मागे

Amethi काँग्रेसच्या कार्यालयावर मध्यरात्री हल्ला, अनेक वाहनांची तोडफोड

Ajit Pawar यांच्याकडून रोहित पवार यांच्या रडण्याची नक्कल

‘तो’ प्रसंग सांगताना आमदार रोहित पवार यांना अश्रू अनावर

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील ‘या’ भागात सलग तिसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय