Sunday, May 19, 2024
Homeताज्या बातम्यामोठी बातमी : दिंडोरीतून माकपचे उमेदवार जे पी गावित यांचा उमेदवारी अर्ज...

मोठी बातमी : दिंडोरीतून माकपचे उमेदवार जे पी गावित यांचा उमेदवारी अर्ज मागे

Dindori : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी येत आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते माजी आमदार जे पी गावित यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. माकपने दिंडोरीत भाजपचा पराभव सुनिश्चित करण्यासाठी हा मोठा निर्णय घेतला आहे. तसेच महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दिंडोरी (Dindori) लोकसभा मतदारसंघाची जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला मिळावी अशी मागणी पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीकडे करण्यात आली होती. माकपने महाराष्ट्रातील 48 पैकी केवळ ही एकच जागा पक्षास मिळावी, तसेच दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने आमच्या पक्षाच्या उमेदवारास अधिकृतपणे पुरस्कृत करावे, अशी माकपची मागणी होती. यासाठी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करण्यात आले. मात्र पक्षाच्या या प्रयत्नांना यश आले नाही. 

Dindori

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीतून भाजपकडून डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. ही जागा माकपला मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. माकपला ही जागा न मिळाल्याने माकपच्या वतीने माजी आमदार जे पी गावित (J P Gavit) यांनी उमेदवारी जाहीर करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, आता जे पी गावित यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला आहे.

दरम्यान, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा दारुण पराभव करण्यासाठी मविआचे अधिकृत उमेदवार भास्कर भगरे यांना जाहीर पाठींबा देत मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन केले आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

Amethi काँग्रेसच्या कार्यालयावर मध्यरात्री हल्ला, अनेक वाहनांची तोडफोड

Ajit Pawar यांच्याकडून रोहित पवार यांच्या रडण्याची नक्कल

‘तो’ प्रसंग सांगताना आमदार रोहित पवार यांना अश्रू अनावर

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील ‘या’ भागात सलग तिसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के

बीड लोकसभा मतदारसंघांतर्गत ‘या’ तारखांना करता येणार पोस्टल मतदान

भाजप उमेदवार कंगना राणौतची जीभ घसरली, भाजप नेत्यावरच केली टीका

अभिनेत्री कंगना राणौतचे अमिताभ बच्चन यांच्याबाबत मोठे विधान, म्हणाली…

देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोठा कट रचल्याचा भाजप नेत्याचा गंभीर आरोप

कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यातशुल्क आकारुन शेतक-याच्या ताटात माती कालविली – अमोल कोल्हे

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय