Saturday, May 18, 2024
Homeताज्या बातम्यादेवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोठा कट रचल्याचा भाजप नेत्याचा गंभीर आरोप

देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोठा कट रचल्याचा भाजप नेत्याचा गंभीर आरोप

Mohit Kamboj : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोठा कट रचल्याचा गंभीर आरोप भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. याबाबत लवकरच खुलासा करणार असल्याचे मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

राज्यात लोकसभा निवडणूकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत राज्यातील लोकसभा निवडणूकीचे 2024 चे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. अशात आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी सोशल मीडिया एक्स (आताचे ट्वीटर) वर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये कंबोज यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविरोधात मोठा कट रचण्यात आला होता, असा गौप्यस्फोट केला आहे. हा कट काय आहे, तो कोणी आणि का केला याचा खुलासा ते लवकरच करणार आहेत. असल्याचेही मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी ट्वीट मध्ये म्हटले आहे. अर्थातच कंबोज यांचा रोख महाविकास आघाडीकडे आहे.

Mohit Kamboj यांचं ट्वीट नेमकं काय?

भाजप नेते मोहित कंबोज यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविरोधात मोठा कट रचण्यात आला होता. या कटासंदर्भात लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची एक बडी महिला नेता, एक माजी आयपीएस अधिकारी आणि एका माजी पत्रकराचा समावेश आहे. या संदर्भात लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार असून यासाठी तयार राहा. असं ट्वीट कंबोज यांनी केलंय.

दरम्यान, कंबोज यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. ते नेमका काय गौप्यस्फोट करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यातशुल्क आकारुन शेतक-याच्या ताटात माती कालविली – अमोल कोल्हे

ब्रेकिंग : माजी मंत्री एचडी रेवण्णा यांना अटक, एसआयटीची मोठी कारवाई

मोठी बातमी : रोहित वेमुला दलित नसल्याचा पोलिसांचा दावा, सर्व आरोपींना क्लीन चिट

ब्रेकिंग : दलित चळवळीतील अग्रणी नेते गंगाधर गाडे यांचे निधन

धक्कादायक : जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोन जणांना जिवंत जाळल्याची घटना

ब्रेकिंग : उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दणका; 6 कंपन्यांना नोटिस

मोठी बातमी : शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय