Saturday, May 18, 2024
Homeताज्या बातम्याGadchiroli: जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोन जणांना जिवंत जाळले

Gadchiroli: जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोन जणांना जिवंत जाळले

Gadchiroli : गडचिरोली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्याच्या बार्सेवाडा येथे जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोन जणांना जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 1 मे रोजी सर्वत्र महाराष्ट्र दिन (Maharashtra Day) उत्साहात साजरा केला जात असताना, त्याच पुरोगामी महाराष्ट्रात ही हृदय पिळवून टाकणारी घटना घडली आहे.

1 मे रोजी राज्यात सर्वत्र महाराष्ट्र दिन साजरा केला जात असताना गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील बार्सेवाडा येथे जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोन जणांना काही गावकऱ्यांनी मिळून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जमनी तेलामी (53), देऊ आतलामी (60) अशी मृतांची नावे असून याप्रकरणी 15 जणांना अटक करण्यात आली आहे. जमनी आणि देऊ हे दोघे जादूटोणा करीत असल्याचा संशय काही गावकऱ्यांना होता.

१ मे रोजी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास गावकऱ्यांनी एकत्र येत दोघांना अतिशय निर्दयीपणे मारहाण केली. त्यानंतर मरणासन्न अस्वथेत असलेल्या दोघांना ओढत नेत रात्री १० वाजतादरम्यान गावाबाहेरील नाल्यात पेटवून दिले. दुसऱ्या दिवशी उशीरापर्यंत याविषयी कुणालाच माहिती नव्हती. हे प्रकरण दुसऱ्या दिवशी उजेडात आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी रितसर कारवाई करत गावातील एकूण १५ जणांना अटक केली आहे. तसेच आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींमध्ये मृत जमनी हीचा नवरा देवाजी तेलामी (60) आणि मुलगा दिवाकर तेलामी (28) यांचा देखील समावेश आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दणका; 6 कंपन्यांना नोटिस

मोठी बातमी : शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात

निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश

मोठी बातमी : 66 प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसचा भीषण अपघात

लोकप्रतिनिधीच्या वेशातील व्यापारी, डॉ. अमोल कोल्हेंचा आढळराव पाटलांवर निशाणा

मोठी बातमी : आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील वाहनाचा अपघात, चौघांचा मृत्यू

मोठी बातमी : ठाकरे गटाच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला, 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल

ब्रेकिंग : सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉफ्टर क्रॅश

MPSC च्या रखडलेल्या तारखांबाबत मोठी अपडेट, वाचा !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय