Sunday, December 8, 2024
Homeताज्या बातम्याKiran sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील वाहनाचा अपघात, चौघांचा मृत्यू

Kiran sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील वाहनाचा अपघात, चौघांचा मृत्यू

Kiran sarnaik : शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील वाहनाचा अपघात झाला आहे. या अपघातात सरनाईक यांच्या कुटूंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

अमरावतीचे शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. दोन कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. अकोला जिल्ह्यातल्या पातूर शहराजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये आमदार किरण सरनाईक (Kiran sarnaik) यांच्या कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे.

कारमधून किरण सरनाईक यांचा भाऊ, भावाचा मुलगा, मुलगी आणि नात प्रवास करत होते. या अपघातामध्ये अनेक जण जखमी झाले असून जखमींना अकोल्याच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही कारचा चक्काचूर झाला आहे.

कोण आहेत Kiran sarnaik ?

अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून अ‍ॅड. किरण सरनाईक यांनी निवडणूक लढवत विजय मिळवला होता. किरणराव सरनाईक हे वाशिम जिल्ह्यातील शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. सरनाईक हे काही काळ अकोला जिल्ह्यात युवक काँग्रेसचे माजी अध्यक्षही होते. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वाशिम दौऱ्यावर आले असताना त्यांच्या उपस्थितीत आमदार किरणराव सरनाईक यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : ठाकरे गटाच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला, 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल

ब्रेकिंग : सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉफ्टर क्रॅश

MPSC च्या रखडलेल्या तारखांबाबत मोठी अपडेट, वाचा !

मोठी बातमी : राहुल गांधींना या मतदार संघातून उमेदवारी जाहीर

‘हिंदू विधि झाले नसल्यास ते लग्न ग्राह्य धरले जाणार नाही’ सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

कोरोना लसीचे साईड इफेक्ट; लस प्रमाणपत्रावरून पंतप्रधान मोदींचा फोटो हटवला, चर्चेला उधान

‘अनुपमा’ फेम अभिनेत्री रुपाली गांगुली राजकारणात उतरली, ‘या’ पक्षात केला प्रवेश

ब्रेकिंग : मिमिक्री आर्टिस्ट श्याम रंगीला पंतप्रधान मोदींच्या विरोधात लढणार निवडणूक

संबंधित लेख

लोकप्रिय