Kanhaiya kumar : काँग्रेसचे ईशान्य दिल्लीतील लोकसभा उमेदवार कन्हैया कुमार यांच्यावर शुक्रवारी (ता. 17) हल्ला झाला. ते मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार करत होते. त्यावेळी त्यांना काही लोकांनी बेदम मारहाण केली. मारहाण करणारे आरोपी पुष्पहार घालण्याच्या बहाण्याने कन्हैया (Kanhaiya kumar) यांच्याजवळ गेले होते.
निवडणूक प्रचारादरम्यान दिल्लीच्या उत्तर मतदारसंघातून काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे उमेदवार कन्हैया कुमार यांच्यासोबत मारहाणीचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कुमार यांना पुष्पहार घालण्याच्या बहाण्याने काही लोक त्यांच्याजवळ आले. जवळ येताच कन्हैया कुमार यांना मारहाण करण्यात आली. त्यावेळी कन्हैया कुमार (Kanhaiya kumar) यांच्यावर शाईही फेकली. या घटनेबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
या घटनेदरम्यान, आरोपींनी आपच्या नगरसेविका छाया गौरव शर्मा यांच्याशी गैरवर्तन केले. हल्लेखोरांनी प्रचार करणाऱ्या लोकांवर काळी शाई फेकली आहे. तसेच यावेळी झालेल्या झटापटीत इतर तीन-चार लोकही जखमी झाले आहेत. यात महिलांचा समावेश असल्याचाही छाया शर्मांनी म्हटले आहे.
दरम्यान, कन्हैयाने भाजपचे उमेदवार मनोज तिवारी यांच्यावर निवडणूक हरण्याच्या भीतीने गुंड पाठवल्याचा आरोप केला. कन्हैया म्हणाला, ‘भाजप 400 चा आकडा पार करण्याची तयारी करत नाही, तर लोकशाही नष्ट करण्याची तयारी करत आहे. आपल्यावर अन्याय होत आहे. मला भीती वाटत नाही.


हेही वाचा :
ब्रेकिंग : लिपिक टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांची यादी जाहीर
मतदारांनो…. मोबाईल ॲप व ऑनलाईन माध्यमातून काढा मतदार चिठ्ठी
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 524 जागांसाठी भरती
हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत 80 पदांची भरती
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती
भारतीय सेना TES अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!
Newsclick संपादक प्रबीर पुरकायस्थ यांची अटक बेकायदेशीर, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय