Sunday, May 19, 2024
Homeताज्या बातम्याभाजप उमेदवार कंगना राणौतची जीभ घसरली, भाजप नेत्यावरच केली टीका

भाजप उमेदवार कंगना राणौतची जीभ घसरली, भाजप नेत्यावरच केली टीका

Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या कंगना लोकसभेच्या मैदानात आहे. कंगना राणौतला भाजपने उमेदवारी दिली आहे. हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातून कंगना राणौत लोकसभा निवडणूक लढवत आहे. लोकसभा निवडणूकीचा प्रचार करताना तिने अनेकदा वादग्रस्त विधान केलेले. आता पुन्हा एकदा कंगनाने चक्क तिच्याच पक्षातील नेत्यावर टीका केली आहे.

अभिनेत्री कंगना राणौत सध्या मंडी मतदारसंघात प्रचारसभेमध्ये दंग झाली आहे. विरोधकांवर सातत्याने टीका करत आहे. अशात तिच्याकडून एक मोठी चूक झाली आहे. विरोधी पक्षांवर टीका करताना तिने स्वतःच्या पक्षातील खासदार तेजस्वी सूर्या यांचे नाव घेत टीका केली आहे. त्यामुळे कंगना आता चांगलीच अडचणीत सापडली आहे.

कंगना राणौतला (Kangana Ranaut) मासे खाण्यावरून राष्ट्रीय जनता दलचे नेते यांचं नाव घ्यायचं होतं. मात्र कंगनाने भाजपच्या नेत्याचं नाव घेतलं. तेजस्वी सूर्या असं त्या भाजप नेत्याचं नाव असून कंगनाने तेजस्वी सूर्या यांच्यावर वक्तव्य केलं. तेजस्वी सूर्या आणि तेजस्वी यादव या नावात कंगनाचा गोंधळ उडाला आहे.

Kangana Ranaut ने काय टीका केली ?

रॅलीमध्ये प्रचारावेळी कंगना राणौतला विरोधकांवर हल्लाबोल चढवत असताना कंगनाने चुकून आपल्याच भाजप पक्षातील खासदार तेजस्वी सूर्या यांना तिनं सुनावलं. प्रचारसभेत बोलत असतान ती म्हणाली की, “हा बिघडलेल्यांचा पक्ष आहे. त्यांनाच माहित नाही की त्यांना कुठे जायचं आहे. मग ते राहुल गांधी असो, ज्यांना चंद्रावर बटाटे उगवायचे असतील किंवा मग तेजस्वी सूर्या असो जे गुंडगिरी करतात आणि मासे खातात,” असं वक्तव्य कंगनाने केलं आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात तेजस्वी यादव यांचा हेलिकॉप्टरमध्ये बसून मासे खातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावर भाजपच्या अनेक नेत्यांनी टीका केली होती.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोठा कट रचल्याचा भाजप नेत्याचा गंभीर आरोप

कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यातशुल्क आकारुन शेतक-याच्या ताटात माती कालविली – अमोल कोल्हे

ब्रेकिंग : माजी मंत्री एचडी रेवण्णा यांना अटक, एसआयटीची मोठी कारवाई

मोठी बातमी : रोहित वेमुला दलित नसल्याचा पोलिसांचा दावा, सर्व आरोपींना क्लीन चिट

ब्रेकिंग : दलित चळवळीतील अग्रणी नेते गंगाधर गाडे यांचे निधन

धक्कादायक : जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोन जणांना जिवंत जाळल्याची घटना

ब्रेकिंग : उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दणका; 6 कंपन्यांना नोटिस

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय