Sunday, May 19, 2024
Homeताज्या बातम्याKangana Ranaut : अभिनेत्री कंगना राणौतचे अमिताभ बच्चन यांच्याबाबत मोठे विधान, म्हणाली…

Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना राणौतचे अमिताभ बच्चन यांच्याबाबत मोठे विधान, म्हणाली…

Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना राणौत यावेळी लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावत आहे. कंगना हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) तिकिटावर निवडणूक लढवत आहे. मतदानापूर्वी कंगना जोरदार प्रचारात व्यस्त आहे. आता तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती दावा करताना दिसत आहे की, अमिताभ बच्चन यांच्यानंतर चित्रपटसृष्टीत तिचा सर्वात जास्त आदर केला जातो.

एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना कंगना राणौत म्हणाली, “कंगनाचे संपूर्ण देशाला आश्चर्य वाटत आहे. मी राजस्थानला जाईन की बंगालला जाईन, दिल्लीत जाईन की मणिपूरला. इतकं प्रेम, एवढा आदर मिळतो, मी दाव्याने सांगू शकते की अमिताभ बच्चन यांच्यानंतर इंडस्ट्रीत मला मिळतो.

कंगणा राणौतच्या (Kangana Ranaut) या विधानावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. यावर मीम्स देखील जोरदार व्हायरल होत आहेत.

दरम्यान, नुकतेच कंगना राणौतने मासे खाण्यावरून राष्ट्रीय जनता दलचे नेते यांचं नाव घ्यायचं होतं. मात्र कंगनाने भाजपच्या नेत्याचं नाव घेतलं. तेजस्वी सूर्या असं त्या भाजप नेत्याचं नाव असून कंगनाने तेजस्वी सूर्या यांच्यावर वक्तव्य केलं. तेजस्वी सूर्या आणि तेजस्वी यादव या नावात कंगनाचा गोंधळ उडाला आहे. यावरून देखील कंगणा चांगलीच चर्चेत आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोठा कट रचल्याचा भाजप नेत्याचा गंभीर आरोप

कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यातशुल्क आकारुन शेतक-याच्या ताटात माती कालविली – अमोल कोल्हे

ब्रेकिंग : माजी मंत्री एचडी रेवण्णा यांना अटक, एसआयटीची मोठी कारवाई

मोठी बातमी : रोहित वेमुला दलित नसल्याचा पोलिसांचा दावा, सर्व आरोपींना क्लीन चिट

ब्रेकिंग : दलित चळवळीतील अग्रणी नेते गंगाधर गाडे यांचे निधन

धक्कादायक : जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोन जणांना जिवंत जाळल्याची घटना

ब्रेकिंग : उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दणका; 6 कंपन्यांना नोटिस

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय