Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : कामगारांसाठी लढणारे लीडर्स हवेत - सचिन अहिर

PCMC : कामगारांसाठी लढणारे लीडर्स हवेत – सचिन अहिर

आकुर्डीत संजोग वाघेरे यांच्या समर्थनार्थ कामगार संघटनांचा संयुक्त मेळावा PCMC

महाविकास आघाडीला विजयी करण्याचा कामगारांचा संकल्प

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : आपण संघटना म्हणून आलेल्या व्यक्ती कुठल्याही जातीच्या, धर्माचा, पक्षाचा आहेत. हे विचार करत नाही. पण, यावेळीची ही निवडणूक आपल्या सर्वांच्या जिवनाशी संबंधित निवडणूक आहे. आज देशाच्या हितासाठी आणि कामगारांच्या संघटित आणि असंघटित शक्तीसाठी लोकसभेमध्ये कामगारांचे प्रतिनिधी करणारे लोक पाठविण्याची आपली नैतिक जबाबदारी आहे. PCMC

आपल्यासाठी लढणारे कामगारांचे लीडर्स पाहिजेत, भाजपच्या व्यासपीठावर बसलेले डीलर नको, पाहिजेत असे मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संपर्कप्रमुख तथा आमदार सचिनभाऊ अहिर यांनी व्यक्त केले. ते आकुर्डी (Akurdi) येथील खंडोबा सांस्कृतिक भवन येथे मावळ लोकसभेचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित कामगार मेळाव्यात ते बोलत होते.

या वेळी मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील, कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष (इंटक) डॉ. कैलास कदम, शिवसेना शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले, सीआयटीयूचे पुणे जिल्हा अध्यक्ष कॉ. अजित अभ्यंकर, अखिल भारतीय कामगार सेनेचे डॉ. रघुनाथराव कुचिक, मेघाताई थत्ते, किरण मोघे, श्रमिक एकता महासंघाचे दिलीप पवार, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे किशोर ढोकळे, आयटकचे कॉ. अनिल रोहम, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे गणेश दराडे, सीटूचे वसंत पवार, कष्टकरी संघर्ष महासंघाचे काशिनाथ नखाते, टाटा मोटर्स युनियनचे शिशुपाल ठोमर, इंटकचे मनोहर गाडेकर, संरक्षण कामगार संघटनेचे सुनील भालेकर, बँक कर्मचारी संघाचे सुनील देसाई, टाटा मोटर्स युनियनचे सतीश काकडे, पीएमपीएलचे राजेंद्र खराडे यांच्यासह कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कामगार वर्ग मोठ्या संखेने उपस्थित होते. pcmc news

आमदार सचिन अहिर पुढे म्हणाले, देशाच्या पंतप्रधान गजनी झालेले आहेत. 2019 ला काय बोलले, 2014 ला काय बोलले, 2024 मध्ये बोलत नाही. त्यांनीच सांगितलं शेतकरी, कष्टकरी आणि कामगारांच्या जीवनामध्ये अच्छे दिन येतील आणि आता जर अशी अवस्था आहे. मात्र, कामगारांच्या प्रश्नाच्या बाबतीत चर्चा होत नाही.

शेतकरी, तरुण, महिला आणि बेरोजगारी यांना काय देणार त्याची चर्चा होत नाही. सध्या देशाचे पंतप्रधान इकडे येतात ‘असली नकलीचा वाद’ करतात आणि भुताटकी लागल्याप्रमाणे आत्मा शोधण्याचे काम चालू आहे. देशातल्या स्तरावरच्या प्रश्नांवर आणि विषयाबाबत चर्चा करत नाहीत. त्यांच्या पायाखालची वाळू घसरत चाललेली आहे. ज्यावेळी सर्व मुद्दे संपतात कुठच्याही मुद्द्याला साथ मिळत नाही. मग जाती जाती आणि धर्माधर्मामध्ये तिढा निर्माण करून आपल्यामध्ये मतभेद निर्माण करून परत एकदा सत्तेवरती बसण्याचा तो त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. pcmc news

जाहीरनामांमध्ये अग्निवीरची योजना रद्द करू कायमस्वरूपी काम देणारी योजना आणण्याचं काम करू. सरकारी कर्मचाऱ्यांची आतापर्यंत सव्वा लाख पद भरले गेले नाहीये म्हणून पहिला काम सरकार मध्ये आल्यानंतर लाभ दोन लाख दरवर्षी एक सरकारी कर्मचाऱ्यांची जे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम चाललेले ते रद्द करून त्या लोकांना देखील रोजगार देण्याचे काम करू हे जाहीरनामांमध्ये आहे. सुशिक्षित बेरोजगारांना भत्ता देण्याचे काम केले जाईल. जेणेकरून त्याची घर आणि कुटुंब चालवण्याची त्यांची परिस्थिती होईल, अशी देखील या जाहीरनाम्यामध्ये काम केलेलं आहे.

उद्धव ठाकरे साहेबांनी स्पष्ट केलेले आहे की, सर्वांत प्रथम बाहेर गेलेले महाराष्ट्रातील उद्योग परत आणण्याचे आहेत. आपल्यातला एक कामगार संजोग वाघेरे पाटील उद्या जर लोकसभेमध्ये गेले तर हक्काने त्यांच्याकडून आपले प्रश्न सोडून घेऊ शकतो. वातावरण बदलत आहे. ज्यावेळी इतिहास लिहला जाईल. या देशात आणि या राज्याचा त्यावेळी एका बाजूला निधी होता. दुसऱ्या बाजूला निष्ठा होती. एका बाजूला हुकुमशाही होती, दुसऱ्या बाजूला लोकशाही होती. हुकूमशाही सोडून लोकशाहीबरोबर आम्ही राहिलो. त्यासाठी संजोग वाघेरे पाटलांना पाठिंबा देवून त्यांना लोकसभेत पाठवा, असं आवाहन त्यांनी केले. pcmc news

या मेळाव्यात पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा, मावळ लोकसभा मतदारसंघातील, तसेच राज्य व देश पातळीवर कार्यरत सुमारे पन्नासहून अधिक कामगार संघटनांनी संजोग वाघेरे पाटील (Sanjog Waghere Patil) यांना पाठिंबा जाहीर केला.

तसेच, संघटनांच्या प्रतिनिधींनी मोदी सरकारच्या धोरणांवर सडकून टीका करत त्यांना व त्यांना मदत करणा-यांना पुन्हा निवडून न देण्याचा निर्णय घेतला.

अन्यायकारक कायदे रद्द करण्यासाठी कामगारांचा आवाज बनणार: संजोग वाघेरे

उमेदवार संजोग वाघेरे पाटील बोलताना म्हणाले की, ही निवडणूक आपल्या अस्मितेची आहे. देशाची प्रगती झाली का, कामगारांची प्रगती झाली का ? आपल्या शेतकऱ्यांची प्रगती झाली का ? देशामध्ये नवीन उद्योगधंदे आलेत का ? जे आहेत ते उद्योगधंदे टिकलेत का ? कामगार काय करू शकतो, हे यापूर्वी आपण देशाला, राज्याला आणि भांडवलदारांना दाखवले आहे. कामगारांची ताकद फार मोठी आहे. कामगार क्रांती आणू शकतो आणि तीच क्रांतीची मशाल आपल्याला आता लोकसभेमध्ये पाठवण्याचे काम कामगारांनी केले पाहिजे. सरकारने जे कायदे बदललेले आहेत ते कायदे रद्द केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. मी तुम्हाला शब्द देतो आणि खात्री देतो जोपर्यंत हे कायदे रद्द होत नाही. तोपर्यंत कामगार म्हणून मी त्या ठिकाणी लढा देत राहणार. अनेक वर्ष कामगारांच्या व्यथा कामगारांचे जे प्रश्न आणि नीमचे प्रश्न आहेत. त्यासाठी बाजू मांडण्याचे काम करणार आहे. मी सुद्धा कामगार असल्यामुळे कामगारांच्या व्यथा मी जाणतो. कामगारांना त्यांच्या हक्काची पेन्शन मिळाली पाहिजे. आशा सेविकेंचा पगार दुप्पट करण्यासठी प्रयत्न करणार आहे. तसेच फोर्स मोटर्स कामगारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपल्या खांद्याला खांदा लावून काम करेल याची खात्री देतो. कामगारांच्या प्रती जी क्रांतीची मशाल आहे. ही मशाल आपल्या कामगारांचे प्रतीक आहे. कामगारांचा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी द्या, अशी साद उपस्थित कामगार वर्गाला घातली.

कामगारांच्या हितावरच मोदी सरकारने घाला घातला: डॉ. कैलास कदम

डॉ. कैलास कदम म्हणाले की, 44 कामगार कायदे ज्या चुकीच्या पद्धतीने त्याच्यावरती घाला घालण्यात आला. कायम कामगार हा शब्दच कायमचाच नष्ट होणार आहे. आपल्याला संप करण्याचा अधिकार काढून घेण्यात आलेला आहे. त्यांनी कोड मध्ये बदल केलेत. आपल्या सर्वाना एकत्र येऊन या देशांमध्ये, केंद्रामध्ये स्थापन झालेले मोदी आणि शहाचं सरकार हे भाजपचे सरकार आणि राज्यांमध्ये स्थापन झालेले हे त्रिसूत्री सरकार आपल्याला खाली खेचायचे आहे. आज लढाई आहे ती धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. एका बाजूला करदात्याची लुट करून धनशक्ती कमवलेली आहे. आणि एका बाजूला जनशक्ती आहे. जनसमुदायामध्ये शेतकरी, कामगार आणि सर्व जाती धर्माचा घटक हा एकत्र आलेला आहे. इंटकच्या माध्यमातून आम्ही राज्यभर फिरून कामगारांना आश्वासित करत आहोत. केंद्रातील भाजप सरकारने कामगार क्षेत्रावर घाव घातला आहे त्या सरकारला उलथवून टाकायचे असेल तर या लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाच्या मशाल चिन्हावर बटन दाबून व्यक्त करायचे आहे. महाविकास आघाडीच्या आणि इंडिया आघाडी राहुलजी गांधी यांचे हात मजबूत करण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला आपल्याला निवडून द्यायचे आहे. बेरोजगारी, महागाई वाढलेली आहे जो कामगारांमध्ये जो असंतोष आहे तो मतपेठीतून दाखवून देयाचा आहे. मावळ लोकसभेचे महाविकास घडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना लोकसभेमध्ये पाठविण्यासाठी मशाल चिन्हावर शिक्कमोर्तब करा, असे आवाहन डॉ. कदम यांनी केले. pcmc news

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

भाजप उमेदवार कंगना राणौतची जीभ घसरली, भाजप नेत्यावरच केली टीका

अभिनेत्री कंगना राणौतचे अमिताभ बच्चन यांच्याबाबत मोठे विधान, म्हणाली…

देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोठा कट रचल्याचा भाजप नेत्याचा गंभीर आरोप

कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यातशुल्क आकारुन शेतक-याच्या ताटात माती कालविली – अमोल कोल्हे

ब्रेकिंग : माजी मंत्री एचडी रेवण्णा यांना अटक, एसआयटीची मोठी कारवाई

मोठी बातमी : रोहित वेमुला दलित नसल्याचा पोलिसांचा दावा, सर्व आरोपींना क्लीन चिट

ब्रेकिंग : दलित चळवळीतील अग्रणी नेते गंगाधर गाडे यांचे निधन

धक्कादायक : जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोन जणांना जिवंत जाळल्याची घटना

ब्रेकिंग : उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दणका; 6 कंपन्यांना नोटिस

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय