Sunday, May 19, 2024
Homeताज्या बातम्याRohit Pawar: ‘तो’ प्रसंग सांगताना आमदार रोहित पवार यांना अश्रू अनावर

Rohit Pawar: ‘तो’ प्रसंग सांगताना आमदार रोहित पवार यांना अश्रू अनावर

Rohit Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून आहे. एका बाजूने अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार तर दुसरीकडे सुप्रिया सुळे या लोकसभेसाठी मैदानात आहे. काल बारामतीमध्ये प्रचारासाठी शेवटचा दिवस होता. काल दिवसभरात बारामतीमध्ये सभांचा तडाखा उडाला होता. बारामतीच्या एका सभेत रोहित पवार (Rohit Pawar) हे शरद पवारांविषयी बोलताना भावूक झाल्याचे बघायला मिळाले.

बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शरद पवार गट आणि अजितदादांच्या गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी बारामतीच्या सभेत रोहित पवार (Rohit Pawar) हे शरद पवारांविषयी बोलताना भावूक झाले. त्यांना बोलताना अश्रू अनावर झाले आणि त्यांचा कंठ दाटून आला होता. त्यांच्या भाषणाची ही क्लीप चांगलीच व्हायरल झाली होती.

काय म्हणाले Rohit Pawar

या सभेमध्ये बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले, जोपर्यंत लढण्यासाठी नवी पिढी तयार होत नाही तोपर्यंत मी डोळे मिटणार नसल्याचे त्यांनी म्हटले होते, असे रोहित पवार यांनी सभेमध्ये सांगितले. हे सांगताना रोहित पवार यांना अश्रू अनावर झाले.

ते पुढे म्हणाले की, माझ्या डोळ्यातील अश्रू हे तुम्ही पक्ष फोडल्यानंतर साहेब जे बोलले ते शब्द ऐकून आलेले खरे अश्रू आहेत… आणि त्यासाठी विचार, काळीज, जीवंत मन आणि अंगात माणूसपण असावं लागतं अजितदादा…. आणि हो… वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाण हृदयी नाही. असे रोहित पवार म्हणाले. त्यावेळी संपुर्ण मैदानात शांतता पसरली होती.

दरम्यान, आमदार रोहित पवार भावूक झाल्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्या भाषणादरम्यान रोहित पवार यांची नक्कल केली. मी तुम्हाला सांगितलं होतं की, शेवटच्या दिवशी तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न होईल. आमच्या एका पठ्ठ्याने डोळ्यातून पाणी काढून दाखवलं. मग मी पण दाखवतो. अरे मला मतदान द्या, असे अजित पवार यांनी म्हटले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील ‘या’ भागात सलग तिसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के

बीड लोकसभा मतदारसंघांतर्गत ‘या’ तारखांना करता येणार पोस्टल मतदान

भाजप उमेदवार कंगना राणौतची जीभ घसरली, भाजप नेत्यावरच केली टीका

अभिनेत्री कंगना राणौतचे अमिताभ बच्चन यांच्याबाबत मोठे विधान, म्हणाली…

देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोठा कट रचल्याचा भाजप नेत्याचा गंभीर आरोप

कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यातशुल्क आकारुन शेतक-याच्या ताटात माती कालविली – अमोल कोल्हे

ब्रेकिंग : माजी मंत्री एचडी रेवण्णा यांना अटक, एसआयटीची मोठी कारवाई

मोठी बातमी : रोहित वेमुला दलित नसल्याचा पोलिसांचा दावा, सर्व आरोपींना क्लीन चिट

ब्रेकिंग : दलित चळवळीतील अग्रणी नेते गंगाधर गाडे यांचे निधन

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय