Sunday, May 19, 2024
Homeताज्या बातम्याALANDI : बैलजोडी सेवेचे मानकरी वस्ताद सहादु कुऱ्हाडे यांचा सत्कार

ALANDI : बैलजोडी सेवेचे मानकरी वस्ताद सहादु कुऱ्हाडे यांचा सत्कार

माऊली मंदिरात ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचा उपक्रम

आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती व ओळख श्री ज्ञानेश्वरीची एक परिवार यांचे वतीने श्री कैवल्य साम्राज्य ज्ञानचक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा रथाचे मानाचे बैलजोडीचे मानकरी प्रगतशील शेतकरी तथा वस्ताद सहादू बाबुराव कु-हाडे यांचा सत्कार श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे व्यवस्थापक माऊली वीर यांचे हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर समितीचे कार्यालयात या सत्कार प्रसंगी श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती अध्यक्ष प्रकाश काळे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक डॉ. राम गावडे, बैलसेवेचे मानकरी वस्ताद सहादु कुऱ्हाडे, चंद्रकांत कुऱ्हाडे, तानाजी कुऱ्हाडे, सुभाष कुऱ्हाडे, बाळासाहेब कु-हाडे, योगेश कुऱ्हाडे, किरण कुऱ्हाडे, आकाश कुऱ्हाडे, गणेश गायकवाड, अर्जुन मेदनकर, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे विश्वस्त विश्वम्बर पाटील, धनाजी काळे, डॉ. राजेंद्र जाधव, महादू वीर, कैलास आव्हाळे, उद्योजक अमोल वीरकर यांचेसह ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवारचे पदाधिकारी उपस्थित होते. Alandi news

यावर्षी आळंदी देवस्थान अंतर्गत पालखी सोहळ्यात श्रींचे रथास सेवेचे मानकरी वस्ताद सहादु कुऱ्हाडे यांची बैलजोडी लावण्यात येणार आहे. त्यांचे नावाची घोषणा नुकतीच करण्यात आली.

या सेवेचा मान मिळाल्या बद्दल श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती आणि श्री ओळख ज्ञानेश्वरीची एक परिवारचे वतीने सोहळ्यास तसेच बैलसेवेचे मानकरी यांना हार्दिक शुभेच्छा समितीचे वतीने अध्यक्ष प्रकाश काळे यांनी दिल्या. उपस्थितीचे हस्ते सत्कार माऊली मंदिरात करण्यात आला. Alandi news

संयोजन श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, विश्वंभर पाटील, धनाजी काळे, कैलास आव्हाळे आदींनी केले. सूत्रसंचालन अर्जुन मेदनकर यांनी केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय