Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : किशोर थोरात यांना लंडन बुक ऑफ वर्ड रेकॉर्ड २०२४ पुरस्कार

PCMC : किशोर थोरात यांना लंडन बुक ऑफ वर्ड रेकॉर्ड २०२४ पुरस्कार

लायन्स क्लब ऑफ पुणे अग्रसेंन तर्फे प्रदान

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर
: लायन्स क्लब ऑफ पुणे अग्रेसन आणि विमान नगर वुमेन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने “लंडन बुक ऑफ वर्ड रेकॉर्ड” चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर थोरात (Kishor Thorat) यांना प्रदान करण्यात आला.

या वर्षी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या ११० व्यक्तींना हा पुरस्कार दिला गेला. नुकताच पुरस्कार वितरण सोहळा ५ मे २०२४ रोजी सिंबोयसिस इंटरनॅशनल स्कूल विमान नगर येथे संपन्न झाला. PCMC NEWS

सदर अवॉर्ड हा लायन राजेश अगरवाल, लायन रवी अगरवाल आणि लायन परमानंद शर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तर या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पुणे शहराचे माजी महापौर जगदीश मुळीक हे होते. लायन्स क्लब ने अतिशय उत्कृष्ठ असे सामाजिक क्षेत्रात काम करणारे हिरे निवडले असून पुरस्कार हे त्यांच्या कामाची गती वाढवण्यासाठी महत्वाचे असतात असेही ते म्हणाले.

किशोर थोरात हे मागील दहा वर्षांपासून वेगवेगळ्या क्षेत्रात आपले उल्लेखनीय काम करत असल्याने हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.किशोर थोरात हे विविध संस्था मार्फत आपले सामाजिक काम करत असतात जसे की ते सध्या
सचिव-आधार शैक्षणिक संस्था,पुणे(गरीब मुलांच्या शिक्षणाला मदत) : शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुणे जिल्हा अध्यक्ष:सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ(मानव अधिकार)-सामाजिक क्षेत्र,सचिव: स्वामी समर्थ सेवा प्रचिती-(अध्यात्म) आणि
सदस्य: समर्थ सोशल फौंडेशन, कोल्हापूर (मधुमेहमुक्त आणि नशामुक्त भारत अभियान) – सामाजिक क्षेत्रात वेगवेगळ्या पदावर काम करून आपले योगदान समाजासाठी देत आहेत. PCMC NEWS

उक्कलगाव तालुका श्रीरामपूर येथील मुळ चे रहिवासी असलेले किशोर अण्णासाहेब थोरात यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी या अगोदरही विविध सामाजिक संस्थांकडून समाजरत्न २०२१ ,आदर्श समाजरत्न प्रेरणा २०२२, आयकॉन ऑफ आशिया २०२२, प्राईड ऑफ नेशन २०२२, आदर्श समाजभूषण प्रेरणा गौरव २०२२ असे
पुरस्कार मिळालेले आहेत.

तर यापुढेही असेच विविध क्षेत्रात आपले उल्लेखनीय काम निश्चितच चालू ठेऊन देशाच्या हितासाठी एक खारीचा वाटा म्हणून काम करत राहणार असल्याचे आणि पुरस्कार हे प्रेरणा देतात आणि त्याचे फळ नक्कीच सेवेतून मिळत असल्याचे किशोर थोरात यांनी सांगितले.

हा अवॉर्ड मिळाल्याबद्दल किशोर थोरात यांचे विविध स्थरातून कौतुक केले जात आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय