Tuesday, May 21, 2024
Homeलोकसभा २०२४KARJAT : संजोग वाघेरे यांना आगरी सेनेचा जाहीर पाठींबा

KARJAT : संजोग वाघेरे यांना आगरी सेनेचा जाहीर पाठींबा

चौक : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत आहे. कर्जत तालुक्यातील चौक येथील आगरी सेनेने संजोग वाघेरे पाटील (Sanjog Waghere Patil) यांना पाठींबा जाहीर करत विजयी करण्याचे आवाहन केले आहे. KARJAT

मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासोबत आणि महाविकास आघाडीला अनेक संस्था, संघटनांचा पाठिंबा मिळत आहेत. त्यांनी दिलेले उमेदवार संजोग वाघेरे पाटील (Sanjog Waghere Patil) यांची विनम्र, संवेदनशील आणि लोकांच्या हाकेला धावून जाणारे राजकारणी म्हणून ओळख आहे. म्हणूनच पिंपरी, चिंचवड, मावळ विधानसभेसह रायगड जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातून पाठबळ मिळत आहे. KARJAT NEWS

रायगड जिल्ह्यातील आगरी व बहुजन अल्पसंख्याक जमातीचा समूह आपल्या पाठीशी खंबीरपणे आहे. त्यामुळे संजोग वाघेरे पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. या बाबत आगरी सेनेचे रायगड जिल्हा प्रमुख व महाराष्ट्र प्रदेश सदस्य सचिन एकनाथ मते यांच्या वतीने पाठिंब्याचे पत्र देण्यात आले आहे. KARJAT NEWS

आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी, आगरी सेना नेते प्रदीप साळवी, युवा आगरी सेनेचे राहुल साळवी यांच्या आदेशाने मावळ लोकसभा मतदार संघात (Maval loksabha 2024) जोमाने काम करीत आहे. तसेच, आगरी सेनेच्या वतीने उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचे “मशाल” चिन्ह घराघरात पोहोचवणार असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील शरद पवार यांचे मोठे विधान

राज्यात ११ मतदारसंघात अंदाजे ६१.४४ टक्के मतदान

बारामतीत पोलिसांच्या ‘बंदोबस्तात’ पैशांचा पाऊस ? रोहित पवारांचे गंभीर आरोप

‘EVM’ मशीनच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्यास अटक

TMC : टाटा स्मारक हॉस्पिटल येथे भरती

मोठी बातमी : दिंडोरीतून माकपचे उमेदवार जे पी गावित यांचा उमेदवारी अर्ज मागे

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय