Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्याHSC Result : बारावीचा निकाल जाहीर; यंदा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के

HSC Result : बारावीचा निकाल जाहीर; यंदा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के

HSC Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहिर करण्यात आला आहे.राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. यंदा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के लागला आहे. तसेच निकालात कोकण विभागानं बाजी मारली असून मुली अव्वल ठरल्या आहेत.

राज्य मंडळाने आज बारावीचा निकाल जाहीर केला. यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान घेण्यात आली. बारावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून १५, २०,१८१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १५,०९,८४८ विद्याथी परीक्षेला उपस्थित होते. यातील १३, ८७,१२५ विद्यार्थी यंदा उत्तीर्ण झाले आहेत. यंदा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के लागला आहे. यंदाही निकालात कोकण विभागानं बाजी मारली आहे. गेल्यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल ९१.२५ टक्के लागला होता.

विभागीय मंडळनिहाय HSC Result :

कोकण – ९७.५१
पुणे – ९४.४४
नागपूर – ९२.१२
छत्रपती संभाजीनगर – ९४.०८
मुंबई – ९१.९५
कोल्हापूर – ९४.२४
अमरावती – ९३.००
नाशिक – ९४.७१
लातूर – ९३.३६

असा पहा HSC Result :

hscresult.mahahsscboard.in
mahahsscboard.in
mahresult.nic.in
msbshse.co.in

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला अटक, वाचा अपघातातील धक्कादायक बाबी

ब्रेकिंग : आज १२ वीचा निकाल, इथे पहा निकाल !

राज्यात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान

अलिशान कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू ; निबंध लिहिण्यासह इतर अटी टाकत 15 तासांत जामीन मंजूर

धक्कादायक : एकाच तरूणाने केले ८ वेळा मतदान, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

ब्रेकिंग : इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती

मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई

२० दिंडोरी, २१ नाशिक लोकसभा मतदारसंघांसाठी आज मतदान

ब्रेकिंग : 10th, 12th बारावीचा निकालाबाबत मोठी अपडेट

पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? वाचा काय म्हणाले मोदी !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय