Chhattisgarh Naxal Encounter : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर छत्तीसगड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. लोकसभा निवडणूकीच्या मतदानाच्या अगोदरच छत्तीसगड पोलिसांनी तब्बल २९ नक्षलवाद्यांचा खात्मा (Naxal Encounter) केल्याची माहिती आहे. या कारवाईत नक्षलवाद्यांचा कमांडर शंकरराव हा देखील ठार झाला असून तीन जवान जखमी झाले आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छोटे बेटिया पोलीस हद्दीतील जंगल परिसरात मोठी नक्षल कारवाई सुरू असल्याची गुप्त माहिती छत्तीसगड पोलिसांना मिळाली होती. छत्तीसगढच्या कांकेरमध्ये DRG आणि BSF आणि माओवाद्यांच्या संयुक्त दलामध्ये चकमक झाली. संयुक्त टीम या परिसरात नक्षलविरोधी अभियानासाठी जात असताना त्यांच्यावर दुपारी ३ वाजताच्या दरम्यान अचानक गोळीबार सुरू झाला. या चकमकीत २९ नक्षलवादी ठार (Naxal Encounter) झाले.
या चकमकीत नक्षलवाद्यांचा कमांडर शंकरराव हा देखील ठार झाला. चकमकीच्या ठिकाणाहून २९ मृतदेह सापडले आहेत. शंकर राव याच्यावर २५ लाखांचे बक्षीस होते. उर्वरित मृतदेहांची ओळख पटविण्यात येत असून यात आणखी काही मोठ्या नक्षल नेत्यांचा समावेश असू शकतो. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात आधुनिक रायफल, सात एके 47, एलएमजी आणि इन्सास रायफलही जप्त करण्यात आले.
या चकमकी दरम्यान इन्स्पेक्टरसह बीएसएफचे तीन जवानही जखमी झाले. जवानांना उपचारासाठी हेलिकॉप्टरने रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हे ही वाचा :
तुमचे गाव पेसा क्षेत्रात आहे का ? असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची !
लाख रुपयांचे सोयाबीनची चोरी; जुन्नर तालुक्यातील घटना
Junnar : वादळी वाऱ्यात ठिणगी पडून २५ जनावरांचा मृत्यू; तर २ जण गंभीर
जुन्नर : “ये आदिवासी कोळपाटांनो..” म्हणत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी 4 जणांवर अॅट्रॉसिटी दाखल
मोठी बातमी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी
महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार
मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय काय आहेत आश्वासने!
Live मॅच मध्ये कॅच पकडायला गेला अन् पँन्ट खाली आली, रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल
CBIC : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत मोठी भरती
मोठी बातमी : कन्हैया कुमार लोकसभेच्या मैदानात, या ठिकाणाहुन लढणार निवडणूक
अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावात आम्ही पाणी पुरवठा केला, आढळराव पाटीलांची टीका
वसंत मोरेंच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी दिली अशी प्रतिक्रिया की एकच हशा पिकला