Friday, May 10, 2024
Homeताज्या बातम्याRaj Thackeray: वसंत मोरेंच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी दिली अशी प्रतिक्रिया की एकच...

Raj Thackeray: वसंत मोरेंच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी दिली अशी प्रतिक्रिया की एकच हशा पिकला

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडलेले वसंत मोरे (Vasant More) हे सध्याचे वंचित बहुजन आघाडीचे पुण्याचे लोकसभेचे उमेदवार आहेत. महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर तर महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे पुणे लोकसभेची लढतही तिरंगी होणार असल्याचे चित्र आहे. अशात वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेणार असल्याचे म्हटले होते. याबाबत आता नवीन अपडेट समोर आली आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. पंतप्रधान मोदींना पाठिंबा देण्याच्या निर्णयावर उलटसुलट चर्चांना उधान आले होते. तसेच राज ठाकरेंच्या बदललेल्या भूमिकेमुळे त्यांच्यावर जोरदार टीकाही करण्यात येत होती. यावर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदे घेत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी राज ठाकरे यांना वसंत मोरेंबाबतही प्रश्न विचारण्यात आला.

राज ठाकरे यांना वसंत मोरे (Vasant More) यांच्या संदर्भात प्रश्न विचारताच त्यांनी काहीही न बोलता हातवारे करून प्रतिक्रिया दिली. राज ठाकरेंनी पत्रकाराच्या दिशेने केवळ हात जोडले आणि ते पत्रकार परिषदेतून उठून चालू लागले. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना बाईट देऊन जा, असेही सांगितले. त्यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये एकच हशा पिकला.

दरम्यान, वसंत मोर यांनी मनसेमधून बाहेर पडल्यामुळे साहेब नाराज आहेत, आमचे मतभेद झालेत पण मनभेद झालेले नाहीत. मी त्यांच्या सोबत २५ वर्ष होतो. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा पाठिंबा मागण्याचा मी प्रयत्न करेन. पण, काय करावे, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असेल, असे मोरे म्हणाले होते.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय केल्या नवीन घोषणा !

…म्हणून प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्यायला हवा; कपिल पाटीलांचे शरद पवारांना पत्र

मोठी बातमी : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार

धक्कादायक : अनैतिक संबंधला अडथळा ठरत असल्याने गाडी अंगावर घालून तरुणाचा खून

मोठी बातमी : वंचितचे उमेदवार वसंत मोरे घेणार राज ठाकरेंची भेट, मोरे पुन्हा मनसेत जाणार?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः जरी आले तरी संविधान संपवू शकत नाहीत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान

ब्रेकिंग : वंचितला मतदान न करण्याचे महात्मा गांधींच्या पणतूचे आवाहन

ब्रेकिंग : गांधी-आंबेडकरांचे पणतू पुन्हा आमने-सामने !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः जरी आले तरी संविधान संपवू शकत नाहीत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय