Wednesday, May 22, 2024
Homeताज्या बातम्याVasant More : वंचितचे उमेदवार वसंत मोरे घेणार राज ठाकरेंची भेट, मोरे...

Vasant More : वंचितचे उमेदवार वसंत मोरे घेणार राज ठाकरेंची भेट, मोरे पुन्हा मनसेत जाणार?

Vasant More : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडलेले पुण्याचे माजी नगरसेवक आणि सध्याचे वंचित बहुजन आघाडीचे पुण्याचे लोकसभेचे उमेदवार वसंत मोरे (Vasant More) हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. मनसेमधून बाहेर पडल्यामुळे राज साहेब नाराज आहेत, त्यामुळे ते राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेणार असल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले आहे.

वसंत मोरे (Vasant More) यांनी अनेक वर्षे मनसेसोबत काम केले. राज ठाकरे यांनी भोंग्याच्या बाबतीत निर्णय घेतल्यानंतर वसंत मोरे यांनी वेगळी भुमिका घेतली होती. तेव्हा पासून त्यांचे पक्षातील संबंध ताणले असल्याचे बोलले जात होते. आता वसंत मोरे (Vasant More) यांना वंचित बहुजन आघाडीने पुणे लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर वसंत मोरे हे राज ठाकरे यांची भेट घेणार आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा पाठिंबा मागण्याचा मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

वसंत मोर म्हणाले की, पक्षाच्या एका नेत्याकडे राजसाहेबांचा फोन आला होता. मी त्यांना विनंती करून सांगितलं की, कृपया मला फोन देऊ नका. मी राज साहेबांना फसवू शकत नाही. मला माघारी परत जायचंच नाहीये. मला आग्रह करुन साहेबांसोबत बोलायला लावू नका. मला ते जमणार नाही. बोलायला जड होईल. असं मोरे यांनी सांगितले.

मनसेमधून बाहेर पडल्यामुळे साहेब नाराज आहेत, आमचे मतभेद झालेत पण मनभेद झालेले नाहीत. मी त्यांच्या सोबत २५ वर्ष होतो. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा पाठिंबा मागण्याचा मी प्रयत्न करेन. पण, काय करावे, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असेल, असंही मोरे म्हणाले आहेत.

पुण्यात महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना तिकीट मिळालं आहे. त्यांच्याविरोधात वंचितकडून मोरे यांनी आव्हान दिलं असल्याने पुणे लोकसभेची लढत तिरंगी होणार असल्याची चर्चा आहे. 

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : वंचितला मतदान न करण्याचे महात्मा गांधींच्या पणतूचे आवाहन

ब्रेकिंग : गांधी-आंबेडकरांचे पणतू पुन्हा आमने-सामने !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः जरी आले तरी संविधान संपवू शकत नाहीत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान

ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर, वाचा कुणाकुणाला मिळाली उमेदवारी !

मोठी बातमी : भाजप खासदाराच्या सुनेचे गंभीर आरोप, माझा उपभोगाची वस्तू म्हणून वापर

प्रचारा दरम्यान भाजप उमेदवाराने घेतले महिलेचे चुंबन, व्हिडिओ व्हायरल

जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

हरिश्चंद्रगडावरून उडी मारून २२ वर्षीय तरूणीची आत्महत्या

ब्रेकिंग : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू

माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले, आम्ही आंधळे नाहीत

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय