Sunday, December 8, 2024
Homeताज्या बातम्याGandhi Ambedkar : गांधी-आंबेडकरांचे पणतू पुन्हा आमने-सामने !

Gandhi Ambedkar : गांधी-आंबेडकरांचे पणतू पुन्हा आमने-सामने !

Prakash Ambedkar on Tushar Gandhi : महात्मा गांधीचे पणतू तुषार गांधी यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला मतदान न करण्याचे आवाहन केले आहे. यावर आता वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी प्रत्यूत्तर दिले आहे. प्रकाश आंबेडकरांनी तुषार गांधींना कोणताही आधार नसलेले आणि वंचित बहुजनांच्या राजकारणात अडथळा निर्माण करणारे विधान असल्याचे म्हटले आहे. (Gandhi Ambedkar)

वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनीही (Prakash Ambedkar) सोशल मीडिया लिहले की, तुम्ही अलीकडे केलेले विधान अत्यंत चुकीचे, कोणताही आधार नसलेले आणि वंचित बहुजनांच्या राजकारणात अडथळा निर्माण करणारे आहेच; पण संसदीय लोकशाही आणि स्वतंत्र राजकीय नेतृत्वासाठीच्या प्रयत्नांना, तसेच वर्ग, जात आणि धर्माच्या पलीकडे जावून सुरू असलेल्या सर्वसमावेशक राजकारणाला नाकारणारे आहे. तुमच्या आजोबांची ब्रिटिशांविरुद्धची चळवळ सर्वसमावेशक होती, पण तुमचे विचार आणि राजकारणामध्ये तशी स्पष्टता दिसत नाही. महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीसोबत कसा व्यवहार केला हे तुम्हाला माहिती नाही का? त्यांचे राजकारण किती अलिप्त आहे हे तुम्हाला माहीत नाही का? महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये झालेली तडजोड तुम्हाला माहिती नाही का? असा सवाल केला आहे.

तसेच, त्यांनी पुढे म्हटले आहे की, जर तुमच्याकडे राजकीय ज्ञान आणि समज नसेल, तर कृपया निरर्थक गोष्टी करण्यात आणि निराधार आरोप करण्यात तुमचा वेळ घालवू नका. काळच सत्य परिस्थिती समोर आणेल. खरं तर, आताच सगळे संकेत दिसत आहेत. पण, तुम्ही डोळे झाकल्यासारखे संदर्भहीन ज्याला काहीही आधार नाही असे वक्तव्य करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करीत आहात.

दरम्यान, तुषार गांधी यांनी वंचित बहुजन आघाडीनं वेगळी चूल मांडल्यानं पुरोगामी विचारांच्या पक्षांना काही प्रमाणात फटका बसू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली होती. तसेच त्यांनी वंचितला मतदान न करण्याचे आवाहन केले होते.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर, वाचा कुणाकुणाला मिळाली उमेदवारी !

मोठी बातमी : भाजप खासदाराच्या सुनेचे गंभीर आरोप, माझा उपभोगाची वस्तू म्हणून वापर

प्रचारा दरम्यान भाजप उमेदवाराने घेतले महिलेचे चुंबन, व्हिडिओ व्हायरल

जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

हरिश्चंद्रगडावरून उडी मारून २२ वर्षीय तरूणीची आत्महत्या

ब्रेकिंग : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू

माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले, आम्ही आंधळे नाहीत

हृदयपिळून टाकणारी घटना ; मांजराला वाचवण्याच्या नादात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

जुन्नर : ज्यूस, सरबतसाठी आणलेल्या बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याची धक्कादायक घटना

मोठी बातमी : नाना पटोले यांचा भीषण अपघात, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

संबंधित लेख

लोकप्रिय