Monday, May 6, 2024
Homeजुन्नरJunnar : चोरट्यांनी २ घरे फोडली; ११ ताळे सोन्याचे दागिने व रोकड...

Junnar : चोरट्यांनी २ घरे फोडली; ११ ताळे सोन्याचे दागिने व रोकड लंपास

Junnar : वडगाव आनंद (ता. जुन्नर) येथील दोन बंद घरांचे कुलूप तोडून ११ तोळे सोन्याचे दागिने व ३ लाख ५७ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. बुधवारी (ता. २४) दुपारी ही घटना घडली. (Junnar)

याबाबत मारुती भिकाजी गडगे (रा. वडगाव आनंद, ता. जुन्नर) यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, घरातील सर्व जण मुक्ताई मळ्यात असलेल्या शेतावर कामासाठी गेले होते. शेतावरील काम उरकून सायंकाळी कोथींबीर विकण्यासाठी आळेफाटा या ठिकाणी गडगे हे आले असता त्यांच्या शेजारी राहत असलेल्या महिलेने त्यांच्या घरात चोरी झाल्याचे फोनवरून कळविले. गडगे यांनी तातडीने घरी जाऊन पाहिल्यानंतर कपाटातील ७ तोळ्याचे सोन्याचे दागिने व २ लाख ८५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान, अशीच चोरीची दुसरी घटना याच गावात घडली. पादीरवाडी याठिकाणी राहत असलेले‌ गोपीनाथ शिंदे यांच्याही बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील ४ तोळे सोन्याचे दागिने व ७२ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. याबाबत गोपीनाथ शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.

घटनास्थळी आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांनी भेट दिली असून पुढील तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर हे करत आहेत.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : माजी आमदार जे.पी.गावित यांना माकप कडून उमेदवारी जाहीर

मोठी बातमी : शिवसेना ठाकरे गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय आहेत घोषणा !

मोठी बातमी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा कोणकोणत्या केल्या घोषणा !

’महामानव विश्वकाव्य दर्शन काव्यसंग्रह’ निर्मितीसाठी साहित्य पाठविण्याचे बार्टीकडून आवाहन

शिरूर लोकसभेसाठी 46 उमेदवारांचे 58 अर्ज

देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहे तरी कोण ?, वाचा सविस्तर !

भुजबळांनी नकार दिल्याने, आढळराव पाटलांना उमेदवारी डॉ.अमोल कोल्हेंच्या विधानाने खळबळ

धक्कादायक : बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास

रिझर्व्ह बँकेचे पुन्हा एका बॅंकेवर निर्बंध; तुमची तर बँक नाही ना?

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय