Monday, May 6, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : नदीप्रदूषण करणाऱ्या ४ वाहनांवर महापालिकेच्या वतीने कारवाई

PCMC : नदीप्रदूषण करणाऱ्या ४ वाहनांवर महापालिकेच्या वतीने कारवाई

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – थेरगाव आणि किवळे या भागांतून दररोज ट्रक, हायवा, ट्रैक्टर, डंपर, टेम्पो- ४०७, आर.एम.सी. प्लॅन्टची मिक्सर वाहने नदीच्या कडेला राडारोडा टाकत असल्याने नदीप्रदुषण होत असल्याची तक्रार पर्यावरण विभागास प्राप्त झाली. त्यानंतर पर्यावरण विभागाने प्रत्यक्ष पाहणी केली आणि सापळा रचून या सर्व वाहनचालकांवर दिनांक २४ आणि २५ एप्रिल २०२४ रोजी कायदेशीर कारवाई केली. या कारवाईमध्ये १ लाख रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे. pcmc news

पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युनियर इंजिनियर स्वप्निल पाटील, केमिस्ट पुष्पराज भागवत यांनी ही कारवाई केली. त्यासाठी पर्यावरण पथक तसेच एमएसएफ आणि मेस्को जवानांचे पथक यांची मदत घेवून ही कारवाई करण्यात आली. pcmc news

महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये नदीपात्रात भराव टाकणारी ४ वाहने पकडून प्रत्येकी २५ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. यापुढेही नदीपात्रात भराव टाकणाऱ्या किंवा नदीप्रदूषण आणि वायूप्रदूषण करणाऱ्यांवर अशी कारवाई सुरूच राहणार आहे, अशी माहिती सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिली आहे. pcmc news

शहरातील नद्या किंवा नाल्यांच्या बाजूने राडारोडा टाकत असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण करत असल्याचे निदर्शनास आल्यास यापूढेही फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येईल याची नोंद सबंधितांनी घ्यावी. शहरातील वातावरण पर्यावरणपुरक ठेवण्यासाठी महापालिका कटिबद्ध असून नागरिकांनीही यामध्ये महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : EVM बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

कांदा निर्यातीच्या धोरणावरून डॉ. कोल्हे यांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला

मोठी बातमी : माजी आमदार जे.पी.गावित यांना माकप कडून उमेदवारी जाहीर

मोठी बातमी : शिवसेना ठाकरे गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय आहेत घोषणा !

मोठी बातमी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा कोणकोणत्या केल्या घोषणा !

’महामानव विश्वकाव्य दर्शन काव्यसंग्रह’ निर्मितीसाठी साहित्य पाठविण्याचे बार्टीकडून आवाहन

शिरूर लोकसभेसाठी 46 उमेदवारांचे 58 अर्ज

देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहे तरी कोण ?, वाचा सविस्तर !

भुजबळांनी नकार दिल्याने, आढळराव पाटलांना उमेदवारी डॉ.अमोल कोल्हेंच्या विधानाने खळबळ

धक्कादायक : बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास

रिझर्व्ह बँकेचे पुन्हा एका बॅंकेवर निर्बंध; तुमची तर बँक नाही ना?

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय