Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा - काशिनाथ नखाते

PCMC : महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा – काशिनाथ नखाते

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार,कामगार विभागाचा कडून प्रचार.

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दहा वर्षापासून कामगार हा संकटात सापडला असून सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कामगारावरती अन्याय होतो आहे उद्योगपती आणि भांडवलदारांचा अजेंडा हे सरकार राबवत असूल कायमस्वरूपी कामगार पद्धत बंद करून निश्चित मुदतीचा रोजगार केल्याने अडचणी निर्माण केल्या म्हणून या सरकारला दूर करण्यासाठी महाविकास आघाडीच्या (Mahavikas aghadi) उमेदवारांना विजयी करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस चे कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केले. pcmc news

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव खटकाळे, यांचे मार्गदर्शनात आणि प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ आप्पा शिंदे, राष्ट्रवादी असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांच्या प्रयत्नातून महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे, संजोग वाघेरे पाटील यांना विजयी करावे, यासाठी प्रचार करण्यात येत आहे. सध्या कामगार कायद्यामुळे होणारे परिणाम व कामगारांच्या मागण्या असलेले पत्रक मोठ्या प्रमाणात लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाराच्या प्रचारारार्थ वाटप करण्यात येत आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्व एमआयडीसीमध्ये हे पत्रक वाटप करण्यात येत आहेत. pcmc news

यामध्ये रांजणगाव, चाकण, तळेगाव, उर्से, भोसरी, मावळ,हडपसर हिंजवडी पिरांगुट याचा समावेश आहे. कामगारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे सरकारकडून किमान व समान वेतनाची अंमलबजावणी होत नाही ई.एस.आय. व्यवस्था मोडकळीस आली आहे. अशा परिस्थितीमध्ये कामगारांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कामगारांचा जाहीरनामा प्रसारित करण्यात येत आहे.

कामगार कायद्यातील बदलामुळे कामगार पिचलेला आहे. याला कारणीभूत असलेल्या केंद्र सरकारमधील भाजप सरकारच्या विरोधात मतदान करून महाविकास आघाडीला मतदान करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

यात राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते, सचिव तुषार घाटूळे, उपाध्यक्ष राजेश माने, निमंत्रक सुरज देशमाने, सलीम डांगे, महादेव गायकवाड, संदेश जाधव, अनिल मोरे,विजय कदम आदी सहभागी होत आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय