Tuesday, May 7, 2024
Homeताज्या बातम्याShirur Loksabha: शिरूर लोकसभेसाठी 46 उमेदवारांचे 58 अर्ज

Shirur Loksabha: शिरूर लोकसभेसाठी 46 उमेदवारांचे 58 अर्ज

Shirur Loksabha: राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे २०२४ रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज सायंकाळी शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ४४७ उमेदवारांचे ६१८ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

चौथ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत नंदुरबार लोकसभा मतदार संघात 18 उमेदवारांचे 31 अर्ज, जळगाव- 24 उमेदवारांचे 36 अर्ज, रावेर- 31 उमेदवारांचे 45 अर्ज, जालना -47 उमेदवारांचे 68 अर्ज, औरंगाबाद- 51 उमेदवारांचे 78 अर्ज, मावळ- 38 उमेदवारांचे 50 अर्ज, पुणे – 42 उमेदवारांचे 58 अर्ज, शिरूर- 46 उमेदवारांचे 58 अर्ज, अहमदनगर- 43 उमेदवारांचे 55 अर्ज, शिर्डी- 31 उमेदवारांचे 40 अर्ज आणि बीड लोकसभा मतदारसंघात 76 उमेदवारांचे 99 अर्ज दाखल झाले आहेत.

दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघात (Shirur loksabha) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाने) शिवाजीराव आढळराव-पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून आफताब अन्वर मकबूल शेख मैदानात आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

प्रचारातील भुल थापांना बळी पडू नका – शिवाजीराव आढळराव पाटील

ब्रेकिंग : शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

मोठी बातमी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा कोणकोणत्या केल्या घोषणा !

देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहे तरी कोण ?, वाचा सविस्तर !

भुजबळांनी नकार दिल्याने, आढळराव पाटलांना उमेदवारी डॉ.अमोल कोल्हेंच्या विधानाने खळबळ

धक्कादायक : बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास

रिझर्व्ह बँकेचे पुन्हा एका बॅंकेवर निर्बंध; तुमची तर बँक नाही ना?

व्हिडिओ : भाषण सुरू असतानाच नितीन गडकरींना भोवळ

ब्रेकिंग : चीनमध्ये भीषण महापूर, 100,000 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय