Sunday, May 5, 2024
Homeताज्या बातम्यादेशातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहे तरी कोण ?, वाचा सविस्तर !

देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहे तरी कोण ?, वाचा सविस्तर !

Pemmasani Chandrasekhar : तेलगू देसम पार्टीचे गुंटूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पी. चंद्रशेखर हे देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांनी आपल्या कुटुंबाची ५,८८५ कोटी रुपयांची चल-अचल मालमत्ता जाहीर केली आहे. (Pemmasani Chandrasekhar)

पी. चंद्रशेखर यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची वैयक्तिक मालमत्ता २,४४८.७२ कोटी, पत्नी श्रीरत्न कोनेरू २,३४३.७८ कोटी, मुलांच्या नावावर हजार कोटींची मालमत्ता आहे, तर चंद्रशेखर यांच्या कुटुंबीयांवर अमेरिकेतील जे. पी. मॉर्गन चेस बँकेचे अमेरिकेत ११३८ कोटी रुपयांचे कर्ज आहे.

एडीआर संस्थेने यापूर्वी जाहीर केलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील नकुल नाथ यांनी आपली मालमत्ता ७१७ कोटी रुपये जाहीर केली होती. आंध्र प्रदेशातील बुरीपालेम गावातून चंद्रशेखर यांचा प्रवास सुरू झाला. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात त्यांनी फिजिशियन टीचर म्हणून काम केले. विजयवाडा येथील विद्यापीठातून त्यांनी एमबीबीएस केले, तर पेनसिल्वेनिया येथून त्यांनी एमडी केले. चंद्रशेखर यांना सामाजिक सेवेत रस होता. २०१० पासून ते तेलगू देसमच्या अनिवासी विभागाचे काम करत होते. त्यांनी अनेक सामाजिक कल्याण उपक्रम राबवले.

बहुतांशी गुंतवणूक व मालमत्ता अमेरिकेत

चंद्रशेखर यांची बहुतांशी गुंतवणूक व समभाग हे अमेरिकेतील कंपनीत आहेत. तसेच त्यांच्याकडे अमेरिकेत रोल्स रॉइल्स घोस्ट, मर्सिडीज बेंझ व टेस्ला या लक्झरी कार आहेत. चंद्रशेखर यांच्याविरोधात वायएसआर काँग्रेसचे के. वेंकट रोसय्या हे निवडणूक लढवत आहेत.

डॉक्टरांची अशी आहे संपत्ती

एनआरआय उमेदवार असलेले डॉ. पेम्मासानी चंद्रशेखर यांची बहुतांश संपत्ती अमेरिकेत आहे. त्यांनी 2022-23 या आर्थिक वर्षात भारतातील उत्पन्न 3 लाख 68 हजार 840 रुपये इतके दाखवले होते. तर त्यांची पत्नी कोनेरू श्रीरत्न यांचे 1 लाख 47 हजार 680 रुपये इतके उत्पन्न होते. त्यांच्याकडे मुदत ठेवी आणि इतर गुंतवणुकीसह 2,316 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तर चंद्रशेखर यांच्या पत्नी कोनेरू श्रीरत्न यांच्याकडे 2,289 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे.

तसेच चंद्रशेखर यांची स्थावर मालमत्ता 72 कोटी 24 हजार 245 रुपये आहे तर श्रीरत्न यांची 34 कोटी 82 लाख 22 हजार 507 रुपये संपत्ती आहे. त्या दोघांवर 519 कोटींचे कर्ज आहे. जगभरात विविध प्रकारच्या 101 कंपन्यांचे शेअर्स त्यांनी घेतले आहेत.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

भुजबळांनी नकार दिल्याने, आढळराव पाटलांना उमेदवारी डॉ.अमोल कोल्हेंच्या विधानाने खळबळ

मोठी बातमी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा कोणकोणत्या केल्या घोषणा !

धक्कादायक : बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास

रिझर्व्ह बँकेचे पुन्हा एका बॅंकेवर निर्बंध; तुमची तर बँक नाही ना?

व्हिडिओ : भाषण सुरू असतानाच नितीन गडकरींना भोवळ

ब्रेकिंग : चीनमध्ये भीषण महापूर, 100,000 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी

नाशिक येथे पदवीधर व डिप्लोमा उत्तीर्णांसाठी अप्रेंटिस ची मोठी संधी

ब्रेकिंग : APMC शौचालय घोटाळा प्रकरणी संजय पानसरेंना अटक, सात कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय