Saturday, May 4, 2024
Homeताज्या बातम्याSanjay Pansare: APMC शौचालय घोटाळा प्रकरणी संजय पानसरेंना अटक, सात कोटींच्या घोटाळ्याचा...

Sanjay Pansare: APMC शौचालय घोटाळा प्रकरणी संजय पानसरेंना अटक, सात कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

Sanjay Pansare : मुंबई एपीएमसी फळ मार्केटचे संचालक संजय पानसरेंना (Sanjay Pansare) अटक करण्यात आली आहे. APMC शौचालय घोटाळा प्रकरणी पानसरे यांना अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. संजय पानसरेंसह 7 अधिकाऱ्यांचा अटकपू्र्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

APMC संचालक संजय पानसरे यांना सात कोटींच्या शौचालय घोटाळा प्रकरणात (Navi Mumbai APMC Scam) नवी मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने बूधवारी चौकशीसाठी बोलावले होते. चौकशी झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. तसंच या घोटाळ्यातील सात अधिकारी फरार आहेत.

एपीएमसीच्या नियमाप्रमाणे प्रक्रिया न करता, ती डावलून आपल्या मर्जीतल्या संस्थांना वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शौचालयाचे टेंडर दिल्याचा आरोप संजय पानसरेंवर आहे. या प्रकरणात सात कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे साताऱ्यातील उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात एकुण आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी शशिकांत शिंदे यांना उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. इतरांचा जामीन मात्र फेटाळला आहे. अशात संजय पानसरे यांना अटक करण्यात आली आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

सोन्याच्या दर मोठी घसरण; जाणून घ्या नवीन दर

मनोज जरांगे पाटलांवरील चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात

ब्रेकिंग : सभेच्या मैदानासाठी बच्चू कडूंचा राडा, पोलिसांनीच भाजपचे गमचे…

मोठी बातमी : पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय, वाचा काय आहे कारण !

मोठी बातमी : MDH आणि Everest च्या काही मसाल्यांवर बंदी

खासदार श्रीरंग बारणे यांचा अर्ज दाखल

राज्यातील 11 मतदारसंघात २५८ उमेदवार रिंगणात

ब्रेकिंग : मतदान यादीत नाव नोंदविण्याची आज शेवटची तारिख, असा करा अर्ज !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय