Saturday, May 18, 2024
Homeताज्या बातम्याPrakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने राजकीय वर्तूळात एकच खळबळ

Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने राजकीय वर्तूळात एकच खळबळ

Prakash Ambedkar : लोकसभा निवडणूकीच्या अगोदरच काँग्रेसला भाजपने मोठे धक्के दिले आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला होता. आता पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी हा दावा केला आहे केला.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचा एक बडा नेता भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे भाजपच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. सोलापूरच्या एका सभेत प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी हा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे या उमेदवार आहेत. तर महायुतीकडून भाजपच्या तिकीटावर राम सातपुते हे मैदानात आहे. वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार राहुल गायकवाड यांनी माघार घेतल्यानंतर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अपक्ष उमेदवार अतिश बनसोडे यांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्या सभेसाठी ॲड. आंबेडकर यांनी गुरुवारी रात्री उशिरा सोलापूरमध्ये सभा घेतली.

काय म्हणाले Prakash Ambedkar ?

सोलापूरच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम मतदार निर्णायक आहेत. तुम्हीच निर्णय करायचा आहे की भाजपला जिंकून द्यायचं की हरवायचं? अनेक मौलवी आज काँग्रेस काँग्रेस करतायेत. त्यांनी विचारावं की देशभरात एकही मुस्लिम उमेदवार का दिला नाही? भाजपची जी लाईन आहे त्यावरच काँग्रेस जात आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

पुढे ते म्हणाले, सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे निवडणुकीनंतर आपल्या परिवारासह भारतीय जनता पक्षात सामील होतील. त्यांना आपली संपत्ती वाचवायची आहे, त्यामुळे चौकशी टाळण्यासाठी ते भाजपत जातील. त्यांना संविधान बदलाशी काहीही देणंघेणं नाही, अशी जोरदार टीका ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर केली.

दम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : रोहित वेमुला दलित नसल्याचा पोलिसांचा दावा, सर्व आरोपींना क्लीन चिट

ब्रेकिंग : दलित चळवळीतील अग्रणी नेते गंगाधर गाडे यांचे निधन

धक्कादायक : जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोन जणांना जिवंत जाळल्याची घटना

ब्रेकिंग : उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दणका; 6 कंपन्यांना नोटिस

मोठी बातमी : शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात

निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश

मोठी बातमी : 66 प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसचा भीषण अपघात

लोकप्रतिनिधीच्या वेशातील व्यापारी, डॉ. अमोल कोल्हेंचा आढळराव पाटलांवर निशाणा

मोठी बातमी : आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील वाहनाचा अपघात, चौघांचा मृत्यू

मोठी बातमी : ठाकरे गटाच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला, 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय