Parth Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना सुरक्षा देण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बारामती लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांची घोषणा झाल्यापासाून पार्थ पवार (Parth Pawar) सातत्यानं प्रचार करताना दिसत आहेत. या पार्श्वभुमीवर पार्थ पवार (Parth Pawar) यांना सुरक्षा देण्यात आली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी पार्थ पवार मैदानात आहे. पार्थ पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचारसभा घेत आहेत. तसेच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन मतदारसंघातील नागरिकांसोबत संवाद साधत आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना राज्य सरकारने वाय प्लस दर्जाची सुरक्षा (Y Plus Security) देण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, या अगोदर खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी निवडणुकीत प्रचार करणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप केला होता. तसेच आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना सुरक्षा द्यावी, अशीही मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. मात्र पार्थ पवार यांच्या सुरक्षेची मागणी नसताना वाय प्लस सुरक्षा दिल्याने विरोधकांना निवडणुकीमध्ये टीका करण्यासाठी आयताच मुद्दा मिळाला आहे.
या अगोदर देखील पार्थ पवार यांनी गुंड गजानन मारणे याची भेट घेतली होती. यावरून विरोधकांनी जोरदार टीका केली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पार्थ पवार यांची समजूत घालणार असल्याचं स्पष्टीकरण दिले होते.


हे ही वाचा :
मोठी बातमी : MDH आणि Everest च्या काही मसाल्यांवर बंदी
खासदार श्रीरंग बारणे यांचा अर्ज दाखल
राज्यातील 11 मतदारसंघात २५८ उमेदवार रिंगणात
ब्रेकिंग : मतदान यादीत नाव नोंदविण्याची आज शेवटची तारिख, असा करा अर्ज !
७५ टक्क्यापेक्षा जास्त मतदान टक्केवारी साध्य करणाऱ्या केंद्राचा होणार सन्मान
प्रकाश आंबेडकरांचा खळबळजणक दावा, दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे…
ब्रेकिंग : शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर, वाचा किती दिवस असणार सुट्ट्या !
अजितदादांच्या राष्ट्रवादीला चारच जागा मिळतात ही शोकांतिका डॉ. अमोल कोल्हेंचा टोला