Friday, May 3, 2024
Homeताज्या बातम्याShrirang Barane: खासदार श्रीरंग बारणे यांचा अर्ज दाखल

Shrirang Barane: खासदार श्रीरंग बारणे यांचा अर्ज दाखल

Shrirang Barane : महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे (shrirang barane) सलग तिसऱ्यांदा मावळ लोकसभेसाठी अर्ज भरण्यासाठी आकुर्डी येथील खंडोबा देवस्थानचे दर्शन घेऊन आकुर्डी खंडोबा माळ चौक ते पीएमआरडी कार्यालय इथंपर्यंत रॅली (दि. २२) काढून उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह प्रवीण दरेकर, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, विधान परिषद सदस्या उमा खापरे, राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळके, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, भाजपच्या चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप आदी उपस्थित होते.

तसेच मावळ लोकसभा मतदारसंघातील (maval loksabha 2024) शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- घटक पक्ष महायुतीचे हजारो समर्थक त्यांचे सोबत होते.

ढोल ताशे, भगव्या टोप्या, फेटे, भगवे झेंडे, धनुष्यबाण चिन्ह, महायुतीतील पक्षांचे झेंडे घेऊन लोकसभा मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून हजारो कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते. मिरवणुकीतील महिलांची संख्या देखील लक्षणीय होती. ‘अब की बार, चार सौ पार’, ‘फिर एक बार, मोदी सरकार’, घोषणांनी आकुर्डी ते निवडणूक कार्यालयापर्यंत खासदार बारणे यांनी शक्ती प्रदर्शन केले.

मावळ लोकसभा मतदारसंघ पुणे आणि रायगड जिल्ह्यात पसरलेला आहे.

या मतदार संघातील मतदार हा 60 टक्के ग्रामीण तर 40 टक्के शहरी तसेच निमशहरी भागात राहतो. मावळ लोकसभेत मतदारांची संख्या 25 लाखांहून अधिक पोहचलीय. चिंचवडमध्ये भाजपाच्या अश्विनी जगताप, पनवेलमध्ये भाजपाचे प्रशांत ठाकूर, उरणमध्ये अपक्ष निवडून आलेले आणि भाजपा संलग्न असणारे महेश बालदी यांचा अंतर्भाव होतो. याच मतदार संघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पिंपरीतील अण्णा बनसोडे, मावळमध्ये सुनील शेळके आणि कर्जतमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे महेंद्र थोरवे हे विधानसभेचे नेतृत्व करतात.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

राज्यातील 11 मतदारसंघात २५८ उमेदवार रिंगणात

ब्रेकिंग : मतदान यादीत नाव नोंदविण्याची आज शेवटची तारिख, असा करा अर्ज !

७५ टक्क्‍यापेक्षा जास्‍त मतदान टक्केवारी साध्‍य करणाऱ्या केंद्राचा होणार सन्‍मान

प्रकाश आंबेडकरांचा खळबळजणक दावा, दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे…

ब्रेकिंग : शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर, वाचा किती दिवस असणार सुट्ट्या !

अजितदादांच्या राष्ट्रवादीला चारच जागा मिळतात ही शोकांतिका डॉ. अमोल कोल्हेंचा टोला

मोठी बातमी : पुण्यातील तिरंगी लढतीत आता पंतप्रधान मोदींची होणार जाहीर सभा

अनधिकृत जाहिरात फलकावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, गुन्हा दाखल

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय