Saturday, December 7, 2024
Homeताज्या बातम्याPune : अजितदादांच्या राष्ट्रवादीला चारच जागा मिळतात ही शोकांतिका डॉ. अमोल कोल्हेंचा...

Pune : अजितदादांच्या राष्ट्रवादीला चारच जागा मिळतात ही शोकांतिका डॉ. अमोल कोल्हेंचा टोला

Pune : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेत भाजप सोबत जाण्यास पसंती दिली. राज्य सरकारमध्ये सामील होत शिंदेंच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. अनेक आमदार देखील अजित पवारांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सामील झाले. परंतु आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक गट नाराज झाल्याच्या बातम्या झळकल्या आहेत. त्यावर माध्यमांशी बोलताना अजित पवारांच्या पक्षातील नाराजी विषयी डॉ. अमोल कोल्हे (Amol kolhe) यांनी भाष्य केले आहे. Pune

डॉ. कोल्हे (Amol kolhe) माध्यमांशी बोलताना म्हणाले की, खरं तर हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आहे. कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अशा प्रकारच्या नाराजी असणे स्वाभाविक आहे. कारण जे नेतृत्व एकेकाळी २३ जागांचे निर्णय घेऊ शकत होते त्यांना अवघ्या आता चार जागा मिळतात. ही परिस्थिती लोकसभेला असेल तर विधानसभेला काय परिस्थिती असेल हा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होणे स्वाभाविक आहे.

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नाराजी अशी पक्षाच्या बाहेर येत असेल तर ही लोकसभा निवडणुक आणि त्यानंतर होणारी विधानसभा निवडणूकीचे चित्र संभ्रमात असल्याच्या चर्चा देखील जोर धरू लागल्या आहेत.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

अनधिकृत जाहिरात फलकावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, गुन्हा दाखल

निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित

अखेर “त्या” प्रकरणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण

कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? – डॉ. अमोल कोल्हे

युपीएससी परिक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश, झळकले २० विद्यार्थी

दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांवर निवडणूक आयोगाचे बारिक लक्ष

ब्रेकिंग : काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसच्या महासचिवाचा वंचितमध्ये प्रवेश

ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभा उमेदवारांची सहावी उमेदवारी यादी जाहीर


संबंधित लेख

लोकप्रिय