Thursday, May 2, 2024
Homeताज्या बातम्याVanchit Bahujan Aghadi : वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभा उमेदवारांची सहावी उमेदवारी यादी...

Vanchit Bahujan Aghadi : वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभा उमेदवारांची सहावी उमेदवारी यादी जाहीर

Vanchit Bahujan Aghadi : वंचित बहुजन आघाडीची लोकसभा उमेदवारांची सहावी यादी जाहीर झाली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून काही दिवसांपूर्वीच पाचवी उमेदवारी यादी जाहीर केली होती. या यादीत एकूण 10 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. आता वंचितने (Vanchit Bahujan Aghadi) सहावी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकुण दोन जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकसभा उमेदवारांची सहावी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघात प्रशांत रघुनाथ कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दोन दिवसांपुर्वीच काँग्रेस (Congress) पक्षाचा राजीनामा देत वंचितमध्ये आलेल्या उत्कर्षा रूपवते (Utkarsha Rupwate) यांना वंचित बहुजन आघाडीने शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत रघुनाथ कदम यांची लढत उदयनराजे यांच्या विरोधात होणार आहे. तर शिर्डीत ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाघचौरे यांच्याविरोधात उत्कर्षा रुपवते यांच्यात लढत होणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव आणि राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी नुकताच वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला. त्यानंतर आता त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

Police Bharti: पोलिस भरतीसाठी “तब्बल” इतके अर्ज!

राज्यातील ५ मतदार संघात मतदान सुरू, सकाळी दोन तासात झाले ७.२८ टक्के मतदान

मोठी बातमी : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर ईडीची कारवाई, मालमत्ता केली जप्त

ब्रेकिंग : शिरूर लोकसभेसाठी डॉ. अमोल कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ब्रेकिंग : रवींद्र धंगेकर यांच्याकडून पुणे लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल

ब्रेकिंग : सुप्रिया सुळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ब्रेकिंग : डॉ. अमोल कोल्हे आईचा आशिर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार

ब्रेकिंग : भाजप खासदाराचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश

ब्रेकिंग : मुसळधार पावसाने दुबईत महापूर

बीड लोकसभा मतदारसंघासाठी उद्यापासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास प्रारंभ

IFSCA : आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण अंतर्गत भरती


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय