Saturday, December 7, 2024
Homeताज्या बातम्याBeed : लोकसभा मतदारसंघासाठी उद्यापासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास प्रारंभ

Beed : लोकसभा मतदारसंघासाठी उद्यापासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास प्रारंभ

Beed : लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 अंतर्गत 39 बीड (Beed) लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात सोमवार, दि. १३ मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी उमेदवाराकडून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया उद्या, गुरुवार दि. १८ एप्रिल पासून सुरु होत आहे.

गुरूवार 18 रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होत आहे. तसेच याच दिवसापासून दि. 25 एप्रिल 2024 पर्यंत 11 ते 3 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन कार्यालयात नामनिर्देशन पत्र नि:शुल्क दिले जातील. तसेच संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात हे नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील.

नामनिर्देशन पत्रासोबत शपथ पत्र (नमुना 26) हा 25 एप्रिल रोजी तीन वाजेपर्यंत सादर करता येणार आहे. शपथपत्र अपूर्ण असल्यास दुसरे शपथपत्र सादर करण्याची अंतिम वेळ दिनांक 26 एप्रिल सकाळी 11 वाजेपर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांना आपल्या अर्जासोबत मतदार यादीची प्रमाणित पत्र दाखल करावी लागणार आहे. फॉर्म ए व फॉर्म बी 25 एप्रिल दुपारी 3 वाजेपर्यंत सादर करावयाचे आहेत.

नामनिर्देशन पत्र सादर करतेवेळी अनुसूचित जाती तथा जमातीच्या उमेदवारासाठी ₹12,500 /- तर सामान्य वर्गातील उमेदवारासाठी ₹ 25000/- इतकी अनामत रक्कम आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी दि. 26 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होईल. नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम तारीख 29 एप्रिल रोजी सायंकाळी ३ वाजेपर्यंत आहे. अपक्ष उमेदवारांसाठी दहा सूचक असणे आवश्यक आहेत. 29 एप्रिल रोजी ३ वाजेपर्यंत निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल.

उमेदवार त्यांचे नामनिर्देशन हे निवडणूक आयोगाच्या ‘सुविधा’ या वेब पोर्टलवरही उपलब्ध आहे. याद्वारे देखील ऑनलाइन पद्धतीने नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील. अशा प्रकारे सादर केलेल्या ऑनलाईन अर्जाची एक प्रत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे येऊन प्रत्यक्षरीत्या सादर करावी लागणार आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मतदारांनो ! तुम्ही सुध्दा जिंकू शकता बाईक, रेसींग सायकल आणि ॲन्ड्राईड मोबाईल

…आमच्यासाठी कचाकचा बटन दाबा; अजित पवार वादाच्या भोवऱ्यात

मोठी बातमी : सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यासाठी मोजावे लागणार पैसे

ब्रेकिंग : माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांच्या वाहनाला भीषण अपघात

मोठी बातमी : “या” दोन बँकांतून पैसे काढण्यावर निर्बंध; तुमची बँक तर नाही ना?

ब्रेकिंग : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर पोलिस आणि नक्षलवाद्यांत मोठी चकमक, २९ नक्षलवाद्यांचा खात्मा

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या 109 जागांसाठी भरती

तुमचे गाव पेसा क्षेत्रात आहे का ? असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची !

लाख रुपयांचे सोयाबीनची चोरी; जुन्नर तालुक्यातील घटना

Junnar : वादळी वाऱ्यात ठिणगी पडून २५ जनावरांचा मृत्यू; तर २ जण गंभीर

जुन्नर : “ये आदिवासी कोळपाटांनो..” म्हणत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी 4 जणांवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल

मोठी बातमी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी


संबंधित लेख

लोकप्रिय