Wednesday, May 1, 2024
Homeविशेष लेखConkerberry : रानमेवा – आरोग्यदायी करवंद / करौंदा / करुम्चा

Conkerberry : रानमेवा – आरोग्यदायी करवंद / करौंदा / करुम्चा

Conkerberry :

देशातील कड्या कपाऱ्यांमध्ये आपल्याला नेहमीच्या फळांपेक्षा वेगळी फळ पाहायला मिळतात. त्यात महाराष्ट्रात आंबट गोड आंभेळी, डोंगरदऱ्यातील रायवाळ आंबे, गोड व रुचकर तोरणं आणि डोंगरची मैना करवंद होय. गावी गेल्यावर गावच्या अनेक फळांची आपल्याला आठवण येते आणि यातील एक महत्वाचे फळ म्हणजे रानातली करवंद. करवंद हा रानमेवा असून, नैसर्गिकरीत्या उपलब्ध होतो. (Conkerberry)

स्थानिक नाव : करवंद

शास्त्रीय नाव : कॅरिसा करंडास (Carissa carandas, Carissa spinarum)

इंग्रजी नाव : Conkerberry, Karanda

इतर नावे : हिंदी – करौंदा, करुम्चा, आसामी – कारेन्जा, मल्याळी – काराक्का, तामिळ – कलाहा , कन्नडा – करोंदा.

कुळ : Apocynaceae

उपयोगी भाग : पिकलेले व कच्चे फळ

उपलब्धीचा काळ : पिकलेले फळ – एप्रिल-मे

झाडाचा प्रकार : काटेरी झुडूप

वापर : पिकलेले व कच्चे फळ, पाने

आढळ : करवंद हे काटेरी व सदापर्णी झुडूप अ‍ॅपोसायनेसी कुळातील असून, त्याचे शास्त्रीय नाव कॅरिसा करंडास असे आहे. भारतातील वनांमध्ये विशेषत: शुष्क व खडकाळ भागांत आढळते. याशिवाय श्रीलंका, जावा, तिमोर येथेही ते आढळते. साधारण एप्रिल-मे महिन्यात स्थानिक लोक गावाच्या बाजारात पानाच्या द्रोणामध्ये करवंदाची पिकलेली आंबटगोड अशी लहान लहान फळे विकायला घेऊन बसतात. या फळांना चांगली मागणी असते. (Conkerberry)

वनस्पतीची ओळख : करवंद हे काटेरी व सदापर्णी झुडूप अ‍ॅपोसायनेसी कुळातील असून, याची उंची सुमारे ६-७ मीटरपर्यंत असते. करवंदे महाराष्ट्रातील पश्चिम घाटात व कोकणात मोठ्या प्रमाणावर मिळतात. डोंगरकपारीत आपोआप उगवणारी करवंदाची काटेरी झुडपे अनेकदा पाहण्यात येतात. करवंदा झाड लवकर मोठे होत नाही. खूप हळूहळू वाढते. शेळ्या-बकऱ्या या झाडाचा पाला खात नाहीत. एप्रिल आणि मे हा हे फळ लागण्याचा काळ आहे. फुल, पाने, कच्ची व पिकलेली करवंदे तोडल्यानंतर पांढऱ्या रंगाचा चीक येतो आणि तो हाताला चिकटतो. नव्या फांद्या हिरव्या हिरव्या आणि लवचिक असतात. जुन्या फांद्या राखाडी रंगाच्या, खरखरीत, पट्टे किंवा खोबण्या असणाऱ्या असतात. पाने साधारण ५ ते ६ सें.मी. लांब व ३ ते ५ सें.मी. रुंद असून साधी, समोरासमोर, लंबगोल, चिवट, गुळगुळीत आणि चकचकीत दिसतात. हिरवीगार अंडाकृती व टोकाशी निमुळती होत गेलेली असतात. कोवळी पाने लालसर तांबूस रंगाची व लवयुक्त कालांतराने हिरवी होऊन मुख्य १ शिरायुक्त असतात. पानाचा देठ साधारण ०.५ ते १ सें.मी. लांब. १० ते २० फुले फांदीच्या टोकाशी किंवा पानाच्या देठाच्या बेचक्यातून गर्दीने येणारी असतात. पांढरी, अपछत्राकृती व लव असलेली असतात. (Conkerberry)

फळे १० ते १५ मिमी व्यासाचे व लंबगोलाकार साधारण १-२ सें.मी. लांब असते. फळे कच्ची असताना हिरवी असतात…पिकत होत असताना तांबूस होत जाऊन काळ्या रंगाची होतात. ही फळे खाण्याचा आंबट गोड असतात. तर अनेक करवंदाच्या जाळींना कडू करवंद देखील पहायला मिळतात. फळाच्या आत छोट्या तांबूस रंगाच्या दोन बिया पहायला मिळतात.

साधारण डिसेंबर, जानेवारी महिन्यांत करवंदाच्या काटेरी जाळीवर अगदी लहान लहान फुले येऊ लागतात. तर एप्रिल-मे महिन्यात ही फळे पिकून खाण्यास योग्य बनतात. परिपक्व झाल्यानंतर ती गळून पडतात.

औषधी गुणधर्म :

करवंदामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. त्वचेचे विकार करवंदांच्या सेवनाने दूर होतात. हृदयविकारामध्ये करवंदांचे सेवन उपयुक्त ठरते. यामुळे रक्तवाहिन्यातील चरबीचे प्रमाण कमी होऊन रक्तपुरवठा सुरळीत होतो. जर रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवत असेल, तर रोज मूठभर करवंदे खावीत. रक्ताची कमतरता भरून येण्यास मदत होईल. शरीराची रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते. करवंदामध्ये मोठ्या प्रमाणात सायट्रिक अ‍ॅसिड असून, उष्णतेमुळे होणार त्रास कमी करते. उन्हाळ्यामध्ये शरीराचा दाह कमी करण्यासाठी करवंदांचे सरबत उपयोगी ठरते. मळमळ, उलटी अशा त्रासामध्ये करवंदे अत्यंत गुणकारी आहेत. करवंदांची पानेही औषधी असून, मधामध्ये बारीक करून खाल्ल्यास कोरडा खोकला नाहीसा होतो. नैसर्गिकरीत्या कॅल्शिअम भरपूर असून, हाडांच्या विकारांमध्ये उपयोगी ठरतात.

करवंद हे आहारातील फायबरचा एक चांगला स्रोत आहे, जे बद्धकोष्ठता रोखून पाचक आरोग्यास प्रोत्साहन देते. याशिवाय पोटाशी संबंधित इतर समस्यांपासून आराम मिळतो. करवंद मध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन वयानुसार दृष्टी सुधारण्यात, मोतीबिंदूपासून संरक्षण आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

करवंद हे उतार अन्न आहे. उतार म्हणजे हे खाल्ल्याने इतर ओषधांचा गुण जातो व इतर औषधी, गोळ्या, इंजेक्शन लागू पडत नाही. उतार अन्न म्हणून करवंद व जांभूळ या जुळ्या बहिणी आहेत. उतार अन्न असल्यामुळे वर्ण (व्रण किंवा जखम) झाल्यास करवंद मुळीच खात नाही.

इतर उपयोग :

करवंदाच्या फळांची भाजी, लोणचे, चटणी, मुरब्बा करतात. कच्चेपण खातात. काहीजण वरणात टाकतात. चटनीने तोंडात चव येते. करवंदे आंबट असतात, त्यामुळे बाळंतीण बाईला देत नाही. कारण आई व लेकरू (बाळ) दोघांनाही खोकला होतो. करवंद फळांपासून मावा, सुकी करवंदे, मुखवास, सिरप, जाम, करवंद वडीही बनवता येते.

करवंदांची Carissa spinarum नावाची जी जात आहे ती जम्मू-काश्मीर व पंजाबमध्ये कुंपणासाठी आणि सुगंधी फुलांसाठी लावतात. हिच्या पानांमध्ये भरपूर टॅनिन असते. Carissaa carandas ही जात भारतात सर्वत्र उगवते.

सूचना : सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

जुन्नर : “ये आदिवासी कोळपाटांनो..” म्हणत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी 4 जणांवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल

मोठी बातमी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी

महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय काय आहेत आश्वासने!

Live मॅच मध्ये कॅच पकडायला गेला अन् पँन्ट खाली आली, रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल

CBIC : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत मोठी भरती

मोठी बातमी : कन्हैया कुमार लोकसभेच्या मैदानात, या ठिकाणाहुन लढणार निवडणूक

अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावात आम्ही पाणी पुरवठा केला, आढळराव पाटीलांची टीका

वसंत मोरेंच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी दिली अशी प्रतिक्रिया की एकच हशा पिकला

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय