Wednesday, May 1, 2024
Homeविशेष लेखविशेष लेख : पृथ्वीची फुफ्फुसे नाजूक - जल, जंगल, जमीन बचाओ global...

विशेष लेख : पृथ्वीची फुफ्फुसे नाजूक – जल, जंगल, जमीन बचाओ global warming

Global warming – औद्योगिक शहरे, ग्रामीण भागात उष्णतेची लाट सुरू

संपूर्ण मार्च महिन्यात उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवल्या नंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तापमान वाढीने उचांक  गाठला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) उष्णतेच्या लाटेचा इशारा दिल्याने या आठवड्यात पाऱ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

2023 मध्ये, भारताने 122 वर्षांतील दुसरे सर्वात उष्ण वर्ष अनुभवले कारण हे अल निनोचे वर्ष होते जे सामान्य तापमानापेक्षा जास्त होते. IMD च्या मते, फेब्रुवारी, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात तापमान जास्त होते. केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश मध्ये यावर्षी तापमान वाढ मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.

या राज्यातील चेन्नई, कोची, त्रिवेंद्रम,बेंगरूळू, विशाखपटनम, अहमदाबाद, मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, खांडवा आदी प्रमुख शहरात तापमान मार्च एप्रिल २०२४ मध्ये ३८ ते ४१ अंश इतके वाढलेले आहे.

महासागराचे बाष्पीभवन वेगाने होत आहे.

पण सध्या जी तापमानवाढ होत आहे ती खूप जलदगतीने होत असल्याचं दिसत आहे.  मानवनिर्मित वाढते औद्योगीकीकरण, वेगाने होत असलेली वृक्षतोड, कार, मोटर्स यांचा अमर्याद वापर आणि हरित वायू निर्मिती यामुळे तापमान वाढत आहे. पृथ्वीवर महासागर आहेत, त्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस, चक्रीवादळे धुमाकूळ घालत आहेत. global warming news

१९८० ते १९८५ या काळात तापमान निसर्ग चक्राच्या नियमनुसार वाढत होते.त्यामुळे मान्सून आणि मोसमी वारे पर्जन्यमान आल्हाददायक होते. अलीकडे केरळ मध्ये तापमान ५२ अंश आणि ब्राझील मधील ६० अंश तापमान रेकॉर्ड ब्रेक झाले, त्यानंतर अवकाळी पावसाने थैमान घालून शहरे उद्ध्वस्त केली. तामिळनाडू येथील वादळी पाऊस बदलणाऱ्या हवामानाचे धोकादायक इशारे देत आहे.

दोन दिवसांपूर्वी धुळे जळगाव येथील अवकाळी वादळी पावसाने केळीच्या बागा उद्ध्वस्त केल्या आहेत. म्हणजेच निसर्ग बेभरवशाचा झाला आहे. ही बाब वैज्ञानिकांना चिंताजनक वाटते. याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील असं त्यांना वाटत आहे.


इंधनाच्या ज्वलनातून आणि जंगलतोडीमुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं. मानवी हालचालीमुळे मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड हे ग्रीनहाऊस गॅसेस तयार होतात. कार्बन डायऑक्साईड यामुळे तापमान असेच वाढत राहिले तर धरणातील राखीव पाण्याचे साठे संपुष्टात येतील.

वैश्विक तापमानवाढीमुळे पिके उद्‍ध्वस्त होत आहेत. दुष्काळाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कर्ब उत्सर्जनाला तातडीने रोखावे लागेल. त्यामुळे जागतिक अन्नसुरक्षा धोक्यात आली आहे, तहान आणि भुकेने जागतिक लोकसंख्या व्याकूळ होऊ शकते.असा इशारा  ‘युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज’चे कार्यकारी सचिव सायमन स्टेईल यांनी नुकताच दिला आहे. ‘चांथम हाउस’ या विचारगटाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. global warming news

पारंपरिक इंधनाचा वापर कमी केल्याने पर्यावरणाचे संरक्षण होण्याबरोबरच लोकांच्या पैशांची देखील मोठ्या प्रमाणात बचत होईल असे स्टेईल म्हणाले आहे.

महाराष्ट्रात मालेगाव, सोलापूर, अकोला आदी प्रमुख शहरात तापमान ४१ अंश पोचले आहे. शहरात दिवसा संचारबंदी त्यामुळे व्यापार उदिम, व्यवसायात मंदी आली आहे. लहान बालके, वृध्द यांना उष्माघात होत आहे.

तापमान २४ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक वाढल्यास जनावराच्या शरीराच्या तापमानातही वाढ होते. संकरीत गाई, म्हशींना ३८ ते ४१ अंश तापमान सहन होत नाही. जनावरे उष्माघातास बळी पडू शकतात. संशोधनानुसार असे दिसून येते की वातावरणातील सापेक्ष आर्द्रता ४५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास जनावरांच्या उष्मा तणावात एकूण वाढ होते. परिणामी जनावराच्या नियमित शरीरक्रियेत बदल होऊन शरीराच्या अॅसिड बेस बॅलन्समध्ये बिघाड होतो व शरीराचे होमीओस्टॅसीस बिघडून शरीरातील सोडिअम, पोटॅशिअम आणि  बायकार्बोनेटच्या प्रमाणात उलथापालथ होते, परिणामी उत्पादनक्षमता कमी होते. global warming news

तापमान वाढ आता नियंत्रणाबाहेर जात असून हिमखंड विशेषतः आर्क्टिक महासागरातील बर्फ वितळून समुद्र पातळी वाढत आहे.

विकसित देशांनी ग्रीन एनर्जी वापरून पृथ्वीवरील निसर्ग नियमांच्या आधारे विकास करत कार्बन उत्सर्जन कमी केले पाहिजे. पृथ्वीची फुफ्फुसे नाजूक आहेत, त्यासाठी जल, जंगल, जमीन बचाओ  या ध्येयानुसार मानवी विकासासाठी पर्यावरण पूरक विकास केला पाहिजे.

क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : भाजप खासदाराच्या सुनेचे गंभीर आरोप, माझा उपभोगाची वस्तू म्हणून वापर

प्रचारा दरम्यान भाजप उमेदवाराने घेतले महिलेचे चुंबन, व्हिडिओ व्हायरल

जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

हरिश्चंद्रगडावरून उडी मारून २२ वर्षीय तरूणीची आत्महत्या

ब्रेकिंग : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू

माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले, आम्ही आंधळे नाहीत

हृदयपिळून टाकणारी घटना ; मांजराला वाचवण्याच्या नादात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

जुन्नर : ज्यूस, सरबतसाठी आणलेल्या बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याची धक्कादायक घटना

मोठी बातमी : नाना पटोले यांचा भीषण अपघात, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय