Thursday, May 2, 2024
Homeताज्या बातम्याPooja Tadas : भाजप खासदाराच्या सुनेचे गंभीर आरोप, माझा उपभोगाची वस्तू म्हणून...

Pooja Tadas : भाजप खासदाराच्या सुनेचे गंभीर आरोप, माझा उपभोगाची वस्तू म्हणून वापर

Pooja Tadas : आगामी लोकसभा निवडणुकीची देशभरात जोरदार तयारी सुरू आहे. राजकीय पक्षांकडून अनेक ठिकाणी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. अशात भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस यांच्यावर सुनेने गंभीर आरोप केले आहेत. रामदास तडस यांची सून पूजा तडस (Pooja Tadas) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी संपूर्ण तडस कुटुंबियांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

भाजपाने वर्ध्यातून रामदास तडस यांना उमेदवारी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सभा घेणार असल्याचे सांगितले जात आहे. या अगोदरच रामदास तडस यांची सून पूजा तडस (Pooja Tadas) यांनी लग्नानंतर मला एका फ्लॅटवर ठेवलं, मला उपभोगाची वस्तू म्हणून वापरण्यात आलं. त्याच्यातून बाळाचा जन्म झाला. खासदार आणि कुटुंबीय म्हणतात बाळाची डीएनए चाचणी करण्यास सांगितलं जातं, असा गंभीर आरोप केला.

खासदार म्हणतात, मी मुलाला बेदखल केलं, मुलाला घरातून काढलं नाही, मग मला एकटीलाच का काढलं घराबाहेर? माझ्याशी राजकारण करता. तडस कुटुंबीयांनी मला न्याय दिला नाही. म्हणून मी लोकांच्या न्यायालयात न्याय मागण्यासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. असं पूजा तडस म्हणाल्या. या सोबतच मला दोन वेळचं अन्नही दिलं जात नाही. मला रॉड ने मारहाण करण्यात आल्याचाही आरोप पूजा तडस यांनी केला. या पत्रकार परिषदे दरम्यान शिवसेना (ठाकरे गटाच्या) नेत्या सुषमा अंधारे देखील उपस्थित होत्या.

सुषमा अंधारे यांनी कारवाई टाळण्यासाठी रामदास तडस यांच्या मुलाने पूजा तडसशी विवाह केल्याचा आरोप केला. तसेच कारवाईच्या भीतीने फक्त लग्न केलं. पत्नीला फ्लॅटवर नेऊन ठेवलं. पुढे तिची काय अवस्था झाली, ते पाहिलं नाही. तो फ्लॅट विकला, तिला बाहेर काढलं” असाही आरोप अंधारे यांनी केला.

पूजा तडस यांच्या आरोपांनंतर पती पंकज तडस यांनी हे राजकीय षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. एका वाहिनीला प्रतिक्रिया देताना पंकज तडस म्हणाले की, 10 लोकांनी मला हनी ट्रॅप करुन फसवले. याचे सर्व पुरावे मी न्यायालयासमोर सादर केले आहेत. आम्ही यांच्याविरोधात खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हाही दाखल केला आहे. ही 2020 मधील घटना असल्याचे पंकज तडस म्हणाले. तसेच, मी माझा विवाह रद्द करण्यासाठी न्यायालयात दादही मागितली आहे.

रामदास तडस (Ramdas Tadas) यांनीही हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे मला जास्त काही बोलता येणार नाही म्हणत विरोधकांचा डाव असल्याचा आरोप केला. तसेच ते म्हणाले, पूजा तडस आणि पंकज तडस यांचं तीन वर्षांपूर्वी लग्न झालं. काही दिवस दोघांचा सुखी संसार सुरू होता. पण काही समाजकंटकांनी पुजा तडस यांना हाताशी धरुन काही कट रचले. यासंदर्भातील संपूर्ण कॅसेट पंकज तडस यांनी कोर्टात सादर केली आहे.

“दोघांनी ज्यावेळी मला सांगितलं त्यावेळी मला काहीच माहिती नव्हतं. दोघेही वेगळे राहत होते. मी माझ्या मुलाला बेदखल करुन टाकलं होतं. पण यासर्व प्रकरणात माझी काय चूक? मी काय केलंय? असेही रामदास तडस म्हणाले.

दरम्यान, वर्धा लोकसभा मतदारसंघात सासरे विरुद्ध सुनबाईंची लढत रंगणार आहे. भाजपने रामदास तडस (Ramdas Tadas) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या विरोधात त्यांची सून पूजा तडस (Pooja Tadas) या अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

हरिश्चंद्रगडावरून उडी मारून २२ वर्षीय तरूणीची आत्महत्या

ब्रेकिंग : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू

माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले, आम्ही आंधळे नाहीत

हृदयपिळून टाकणारी घटना ; मांजराला वाचवण्याच्या नादात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

जुन्नर : ज्यूस, सरबतसाठी आणलेल्या बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याची धक्कादायक घटना

मोठी बातमी : नाना पटोले यांचा भीषण अपघात, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

ब्रेकिंग : मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा राजीनामा, वाचा काय आहे कारण !

ब्रेकिंग : बसचा भीषण अपघात ; ५० फूट खोल दरीत बस कोसळली, १४ जणांचा मृत्यू

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय