Monday, May 6, 2024
Homeजिल्हाSPPU : पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या गुंडांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी

SPPU : पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या गुंडांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी

SPPU, दि. ११ : गेल्या काही काळापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) हाणामारीच्या घटना सतत घडत आहेत. त्यामुळे विद्यापीठ सातत्याने चर्चेत आहे. नुकतेच एका विद्यार्थ्याला मारहाण झाली आहे. विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या गुंडांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया च्या वतीने कुलगुरूंकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

एस एफ आय ने म्हटले आहे की, दिनांक ०७ एप्रिल २०२४ रोजी जुनेद नावाच्या विद्यार्थ्याला विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बाहेरून येऊन धर्माच्या नावावरून मारहाण केली. हा पूर्णपणे मॉब लिंचिंग चा प्रकार आहे. गेल्या काही दिवसांपासून विशिष्ट पक्ष आणि संघटनांची लोक विद्यापीठांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करत आहे. आणि आता धर्माच्या नावावरून अल्पसंख्यांक मुलाला मारहाण करून धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न विद्यापीठांमध्ये निर्माण झालेला असल्याचे एसएफआय ने म्हटले आहे.

तसेच या सगळ्या प्रश्नांकडे विद्यापीठ प्रशासनाने लक्ष घालून ढासळलेली सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी, विद्यापीठामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या गुंडांवर विद्यापीठाने तात्काळ कायदेशीर कारवाई कारवाई करून, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि संविधानिक अधिकार यांचे जतन करावे, अशि मागणी एसएफआय ने कुलगुरूंकडे केली आहे.

निवेदन देतेवेळी एसएफआय चे शहर सचिव अभिषेक शिंदे, आकाश लोणकर, भार्गवी लाटकर, ऋषीकेश शिंदे, मंगेश गाडेकर, अनिकेत शिंदे, स्नेहल शिरसे आदी विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

हरिश्चंद्रगडावरून उडी मारून २२ वर्षीय तरूणीची आत्महत्या

ब्रेकिंग : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू

माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले, आम्ही आंधळे नाहीत

हृदयपिळून टाकणारी घटना ; मांजराला वाचवण्याच्या नादात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

जुन्नर : ज्यूस, सरबतसाठी आणलेल्या बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याची धक्कादायक घटना

मोठी बातमी : नाना पटोले यांचा भीषण अपघात, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

ब्रेकिंग : मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा राजीनामा, वाचा काय आहे कारण !

ब्रेकिंग : बसचा भीषण अपघात ; ५० फूट खोल दरीत बस कोसळली, १४ जणांचा मृत्यू

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय