Friday, May 3, 2024
Homeताज्या बातम्याRamdev Baba : माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले,...

Ramdev Baba : माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले, आम्ही आंधळे नाहीत

Ramdev Baba : रामदेव बाबा यांना आज पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालायाने (Supreme Court) चांगलेच झापले आहे. पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी रामदेव बाबा (Ramdev Baba) यांची कंपनी पतंजलीच्या वतीने माफीनामा सादर करण्यात आला होता. त्यावेळी न्यायालयाने पतंजलीचा माफी फेटाळून लावला.

पतंजली आयुर्वेदच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणी बुधवारी सर्वोच्च न्यायालायात (Supreme Court) सुनावणी झाली. बाबा रामदेव (Ramdev Baba) आणि आचार्य बाळकृष्ण (Acharya Balkrishna) यांनी कोर्टासमोर बिनशर्त माफी मागितली होती. यावर न्यायालायाने रामदेव बाबांनी मागितलेली माफी फेटाळून लावत प्रतिज्ञापत्रात धोकेबाजी करत असल्याचा ठपका ठेवला. तसेच रामदेव बाबांच्या शपथपत्राला स्वीकार करण्यास नकार दिला. यावेळी बाबा रामदेव आणि बाळकृष्ण (Acharya Balkrishna) हे दोघेही न्यायालयात उपस्थित होते.

न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. त्यावेळी न्यायमूर्ती अमानुल्लाह म्हणाले, या लोकांनी आमच्या आदेशाकडे तीन वेळा दुर्लक्ष केले आहे. यांनी चूक केली आहे. याचे परिणाम यांना भोगावे लागतील. आम्ही आंधळे नाहीत. स्वतःला कायद्यापेक्षा मोठं समजू नये, असा सल्ला कोर्टाने रामदेव बाबांना दिला होता. तसेच केंद्र सरकारने या प्रकरणात दाखल केलेल्या उत्तरावरही कोर्टाने नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने २०२३ मध्ये पतंजली या कंपनीला आदेश दिला होता की, त्यांनी दिशाभूल करणाऱ्या जाहिराती थांबवाव्यात. जर त्यांनी असं केलं नाही तर आम्हाला कारवाई करावी लागेल. नाहीतर पतंजलीच्या प्रत्येक चुकीच्या जाहिरातींवर एक कोटी रुपयांचा दंड आकारण्यात येईल.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

हृदयपिळून टाकणारी घटना ; मांजराला वाचवण्याच्या नादात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

जुन्नर : ज्यूस, सरबतसाठी आणलेल्या बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याची धक्कादायक घटना

मोठी बातमी : नाना पटोले यांचा भीषण अपघात, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

ब्रेकिंग : मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा राजीनामा, वाचा काय आहे कारण !

ब्रेकिंग : बसचा भीषण अपघात ; ५० फूट खोल दरीत बस कोसळली, १४ जणांचा मृत्यू

मोठी बातमी : भाजपला पाठिंबा देताच राज ठाकरेंना मोठा धक्का

मोठी बातमी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मोठी घोषणा

मोठी बातमी : अरविंद केजरीवाल यांना दिल्‍ली उच्‍च न्यायालयाचा मोठा झटका

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय