Friday, May 10, 2024
Homeताज्या बातम्यामोठी बातमी : नाना पटोले यांचा भीषण अपघात, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

मोठी बातमी : नाना पटोले यांचा भीषण अपघात, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

Nana Patole car accident : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. भंडारा येथून प्रचार सभा आटोपून ते सुकळी येथे जात होते, त्यावेळी ही अपघाताची घटना घडली आहे. या अपघातामध्ये नाना पटोले हे थोडक्यात बचावले आहेत. या घटनेनंतर काँग्रेसने भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले आहे.

नाना पटोले हे मंगळवारी रात्री भंडारा येथून प्रचार सभा आटोपून ते सुकळी येथे जात होते. यावेळी भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ ते आले असता एक ट्रक भरधाव वेगात आला. या ट्रकने नाना पटोले (Nana Patole) यांच्या गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, नाना पटोले यांच्या गाडीचा पुरता चक्काचूर झाला.

या अपघातानंतर आता काँग्रेसने भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सोशल मीडिया ‘एक्स’वर लिहले आहे की, विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का ? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौ-यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का ? अशी शंका आहे. मायबाप जनतेच्या आशिर्वादाने नाना पटोले साहेबांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत. असं त्यांनी म्हटले आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : बसचा भीषण अपघात ; ५० फूट खोल दरीत बस कोसळली, १४ जणांचा मृत्यू

मोठी बातमी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मोठी घोषणा

मोठी बातमी : अरविंद केजरीवाल यांना दिल्‍ली उच्‍च न्यायालयाचा मोठा झटका

काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

मोठी बातमी : महाविकास आघाडीची पत्रकार परिषद, वाचा कोणत्या पक्षाला किती जागा !

भाजपच्या बड्या नेत्याने घेतली सलमान खानची भेट, राजकिय वर्तूळात जोरदार चर्चा

सीमा हैदरला पतीकडून जबर मारहाण ; डोळा काळानिळा, चेहरा सुजला ?

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय